इगतपुरीनामा न्यूज, दि. १ भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा गावकऱ्यांना अभिमान असतो. इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील हवालदार शिवनाथ कौसाबाई रंगनाथ सहाणे भारतीय सैन्य दलातील पॅरा रेजिमेंट बटालियन मधुन १८ वर्षची प्रदीर्घ देशसेवा करून सेवानिवृत्त झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी गावकऱ्यांनी वाजत-गाजत मिरवणूक काढली. गावचे सुपुत्र […]
इगतपुरीनामा न्यूज, दि ३१ इगतपुरी तालुक्यातील विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार ही महत्वपूर्ण निवड केली आहे. ह्या समितीमध्ये जिल्ह्यातील अन्य व्यक्तींची सुद्धा निवड झाल्याचा शासन निर्णय निर्णय निर्गमित झाला आहे. […]
प्रमोद परदेशी यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार वितरित इगतपुरीनामा न्यूज, दि. २० नाशिक जिल्ह्यातील कर्तृत्ववान शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार परिणामकारक झाला. नवनवीन उपक्रमांमुळे शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी फायदेशीर ठरली. यामुळेच “टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” अनेकांसाठी दिशादर्शक ठरला. प्रमोद परदेशी यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करतो असे गौरवोद्गार नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. […]
संत एकनाथांना गाढवात देव दिसला कारण ते स्वतः देव होते. आमच्या विठ्ठलाला सुद्धा माणसांत देव दिसतो. आईवडिलांच्या संस्कारी शिकवणुकीतून जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी विठ्ठल लंगडे ह्या तरुणाला मिळाली. ह्यातूनच त्याने इगतपुरी तालुक्यातील अनेक गोरगरिबांचे प्रश्न लीलया सोडवले. लोकांमध्ये विठ्ठल पाहणारा विठ्ठल लंगडे पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत. विठ्ठल भगीरथ लंगडे हे तळोघ ह्या अतिशय […]
लेखन : भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा वाघाच्या तोंडात हात घालावा इतक्या सहजतेने परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून शिक्षणाची अखंड ज्ञानधारा अतिदुर्गम भागात रुजवणारे आदर्श शिक्षक प्रमोद पांडुरंग परदेशी. अवघ्या महाराष्ट्रात दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थी आणि आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी त्यांचा “टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” मैलाचा दगड ठरला आहे. दुर्गम दऱ्याकपारीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात सावित्री जोतीच्या अखंड शिक्षणाचा दिवा […]
शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. १ इगतपुरीतील सह्याद्रीनगर येथील केंद्रीय राखीव दलाचे वीर जवान सचिन चिकने यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले. “अमर रहे अमर रहे…वीर जवान अमर रहे” च्या जयघोषात वीर जवान सचिन चिकणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दुपारी इगतपुरी येथे शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. […]
शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. १ देशाच्या संरक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे इगतपुरी तालुक्यातील भूमिपुत्र सैनिक सचिन गणूजी चिकणे यांचे मंगळवारी कर्तव्यावर असतांना दुर्दैवी निधन झाले. अंतीम क्षणी ते भोपाळ येथे कर्तव्यावर होते. यावेळी त्यांची अचानक तब्बेत खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी इगतपुरी शहर आणि तालुक्यात याबाबत माहिती समजताच सगळीकडे शोककळा पसरली. […]
इगतपुरीनामा न्यूज दि. १२ : श्री महादू बळीराम परदेशी, बदरखेकर यांचा चिरंजीव व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री प्रमोद पांडुरंग परदेशी, कुसुंबा यांचा भाचा कु चेतन महादू परदेशी याला “S for School” या संघटनेचे ची स्थापना करून त्याअंतर्गत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली शाळाबाह्य 1940 मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले. म्हणून केंद्र सरकारने केंद्रीय […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुकचे मंडळ अधिकारी शाम एकनाथ बोरसे नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट मंडळ अधिकारी ठरले आहेत. महसूल दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील १३ अधिकारी आणि कर्मचारी यांची निवड उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी म्हणून करण्यात आली आहे. त्यामध्ये मंडळ अधिकारी संवर्गातुन शाम बोरसे यांचे एकमेव नाव समाविष्ट आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, उपविभागीय अधिकारी […]
तालुका कृषी अधिकारी तंवर यांच्या मार्गदर्शनाने मिळाले यश इगतपुरीनामा न्यूज, दि. १ गहू पिकाच्या उत्पादनात आदिवासी गटातून इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील शेतकरी विठ्ठल भीमा आवारी यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. आज कृषी दिनानिमित्त मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे साहेब हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कृषीमंत्री ना. दादाजी भुसे, महसूल मंत्री […]