चेतन परदेशी यांचा केंद्र सरकार कडून सन्मान

इगतपुरीनामा न्यूज दि. १२ : श्री महादू बळीराम परदेशी, बदरखेकर यांचा चिरंजीव व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री प्रमोद पांडुरंग परदेशी, कुसुंबा यांचा भाचा कु चेतन महादू परदेशी याला “S for School” या संघटनेचे ची स्थापना करून त्याअंतर्गत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली शाळाबाह्य 1940 मुलांना शाळेच्या प्रवाहात आणले. म्हणून केंद्र सरकारने केंद्रीय मंत्री श्री अनुरागजी ठाकूर यांच्याकडून दिल्ली दरबारी राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्यात करण्यात आला. तसेच यापूर्वीही चेतन याने 2018मध्ये ट्राफिक नियोजनसंदर्भात जगात केलेल्या चर्चासत्रात उत्तम कामगिरी केली म्हणून गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नाव दाखल केले आहे.