इगतपुरीनामा न्यूज, दि. १
इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुकचे मंडळ अधिकारी शाम एकनाथ बोरसे नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट मंडळ अधिकारी ठरले आहेत. महसूल दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील १३ अधिकारी आणि कर्मचारी यांची निवड उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी म्हणून करण्यात आली आहे. त्यामध्ये मंडळ अधिकारी संवर्गातुन शाम बोरसे यांचे एकमेव नाव समाविष्ट आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शाम बोरसे यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार क्षेत्रीय स्तरावरील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची निवड करून गौरव करण्याचे निश्चित झालेले आहे. त्यानुसार नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही निवड केली आहे. उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता दुरदृश्य प्रणाली अर्थात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे शाम बोरसे यांच्यासह इतर गुणवंतांचा सन्मान करणार आहेत.
शाम बोरसे हे इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक ह्या मोठ्या महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. यासह त्यांच्याकडे प्रशासकीय कारणात्सव वेळोवेळी दिलेला अतिरिक्त कार्यभारही ते उत्तम पार पाडतात. इगतपुरी तालुक्यातील अभ्यासू आणि महसूल कायद्यांचा सूक्ष्म अभ्यास असणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. निवडणूक काळातही त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. महसुली कामकाज करतांना त्यांचा अफाट जनसंपर्क असून ते नागरिकांमध्ये आदराचे स्थान धारण करून आहेत. त्यांच्या यशाबद्धल इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ठ अधिकारी आणि कर्मचारी असे आहेत
निलेश भास्कर श्रींगी ( उपजिल्हाधिकारी भुसंपादन रा. ह. प्र. नाशिक ), प्रशांत पाटील ( तहसीलदार निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ), जितेद्र इंगळे ( तहसीलदार बागलाण ), पोपट राजाराम सोनवणे ( नायब तहसीलदार टंचाई शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ), मिनल धारणकर ( अव्वल कारकून, पेठ ), शाम एकनाथ बोरसे ( मंडळ अधिकारी घोटी ), सुर्यकांत भोसले ( लिपीक चांदवड ), अश्विनी रविकिरण शेंडे ( तलाठी येवला ), सुमित्रा रामचंद्र थैल ( पोलीस पाटील, कळवण ), मोहन दत्तात्रय कर्वे ( कोतवाल, नाशिक ), मंगेश लोंढे ( वाहन चालक, निफाड ), अनिल वैद्य ( शिपाई, नाशिक ), विशाल पाटील ( लघुलेखक, मालेगांव )