“वीर जवान सचिन चिकने अमर रहे”  “वीर जवान अमर रहे” : सचिन चिकने ह्यांना शासकीय इतमामात अखेरची सलामी

शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. १

इगतपुरीतील सह्याद्रीनगर येथील केंद्रीय राखीव दलाचे वीर जवान सचिन चिकने यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले. “अमर रहे अमर रहे…वीर जवान अमर रहे” च्या जयघोषात वीर जवान सचिन चिकणे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दुपारी इगतपुरी येथे शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रारंभी वीर जवान सचिन चिकणे यांच्या पार्थिवास केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे रमेश वर्मा, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, वसंत पाथरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील, अनिकेत कुलकर्णी, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, मुख्याधिकारी पंकज गोसावी, मंडळ अधिकारी नानासाहेब बनसोडे, लांस नायक विजय कातोरे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

तत्पूर्वी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सचिन यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या पुढे तिरंगा धरून तरूण पुढे चालत होते. सह्याद्री नगर  व परिसरातून अंत्ययात्रा गांधी चौक येथे हुतात्मा स्मारक येथे आली असता नागरिकांनी वीर जवान सचिन चिकणे अमर रहेच्या घोषणा दिल्या. नंतर अंत्ययात्रा इगतपुरी येथील अमरधाम येथे पोहचली त्यानंतर त्यांना पोलिस दल व केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवास त्यांचे मोठे बंधू यांनी अग्नीडाग दिला. वीर जवान सचिन चिकणे यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुली, एक बहिण, दोन भाऊ असा परिवार आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!