वाडीवऱ्हे येथे जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. 19 ग्रामपंचायत वाडीवऱ्हे येथे जागतिक शौचालय दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इगतपुरी तालुका संपर्क अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली, सार्वजनिक शौचालय उदघाटन, वैयक्तिक शौचालय भेटी, शाळेची शौचालय पाहणी, जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छता रन, पथनाट्य, […]

इगतपुरीच्या आदिवासी महिला निर्मित जंगली तुळस आणि जांभूळ मधाची नाशिककरांना पडली भुरळ : नाशिकच्या प्रदर्शनात इगतपुरीच्या मधाचा गोडवा लोकप्रिय

इगतपुरीनामा न्यूज, दि. 17 इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम ग्रामीण आदिवासी भागातील महिलांनी मधमाशी पालनातून उत्पादीत केलेल्या अस्सल मधाचा गोडवा नाशिककरांना चांगलाच भावला आहे. जीवनसंवर्धक मधमाशी पालन करून जंगली तुळस आणि जांभूळ झाडांमधून मिळवलेले मध नाशिक येथील प्रदर्शनात विक्रीला ठेवण्यात आले आहे. नाशिककर नागरिक आणि प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांनी ह्या अस्सल मधाची जोरदार खरेदी केली. शबरी आदिवासी […]

८७ वर्षीय वृद्ध रुग्णाने कॅन्सरला हरवले ; ३ तास सुरु होती गुंतागुंतीची शस्त्रक्रिया : टाटा मेमोरियल सेंटरचे तांत्रिक मार्गदर्शन ; एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिटयूट ठरतेय रुग्णांसाठी वरदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. 12   मनात सकारात्मकता, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुटुंबियांची साथ असेल तर कुठल्याही आजारावर मात करणे शक्य होते असे म्हटले जाते. याच उक्तीचा प्रत्यय नाशिकमधील एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिटयूटमध्ये आला. कोपरगाव येथील ८७ वर्षीय कर्करोगग्रस्त वृद्ध रुग्णावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात येथील कर्करोग तज्ञांना यश आले आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी या रुग्णाने फेरफटका मारत […]

२७ नोव्हेंबरला घोटीत महाआरोग्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर : नागरिकांनी लाभ घेण्याचे गोरख बोडके यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ अनेक व्याप, धावपळीचे जीवनमान, चुकीची आहारशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. असे असूनही संभाव्य आजारांना रोखण्यासाठी कोणीही आपल्या बहुमोल आरोग्याची तपासणी करीत नाही. परिणामी इगतपुरी तालुक्यात अनेकांना अचानक ह्या जगाचा निरोप घेण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे दिसते. ह्या अघटीत घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शरीराची तज्ञांकडून योग्य […]

हिवताप निर्मूलन कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय राव, व्हॉइस चेअरमनपदी उषा देवरे बिनविरोध : २५ वर्षाच्या सत्तेमध्ये परिवर्तन घडवून आपला पॅनल सत्तेवर

इगतपुरीनामा न्यूज, दि. 3 नाशिक जिल्हा हिवताप निर्मूलन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संजय रामू राव आणि व्हॉइस चेअरमनपदी उषा भारत देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी वृषाली मैद यांनी बिनविरोध निवडीची घोषणा करताच सभासद आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हिवताप निर्मूलन कर्मचाऱ्यांची अतिशय जिव्हाळ्याची समजली जाणारी ही पतसंस्था प्रमुख अर्थवाहिनी आहे. नुकत्याच झालेल्या […]

तारांगणपाडा येथील १ जणाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू ? : ६ लोकांना डिस्चार्ज ; ५ जणांवर उपचार सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. 17 इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा येथील 1 जण नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यूमुखी पडला. सक्रू शंकर मेंगाळ वय 47 असे त्यांचे नाव असून शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जुलाब आणि उलट्या झाल्यामुळे हा मृत्यू झाला असल्याची चर्चा गावात सुरु आहे. अनेक नागरिकांना […]

तारांगणपाडा येथे दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास

इगतपुरीनामा न्यूज, दि. 16 इगतपुरी तालुक्यातील तारांगणपाडा येथील 15 पेक्षा अधिक नागरिकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील विविध हॉस्पिटलमध्ये ह्या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. घोटी, नाशिक येथील खाजगी रुग्णालयांमध्ये काही नागरिक उपचार घेत आहेत. एकाच वेळेस पंधरा ते वीस जणांना […]

श्री साई सहाय्य समिती, प्रभुनयन फाउंडेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. 29 इगतपुरी शहरातील श्री साई सहाय्य समिती, प्रभुनयन फाउंडेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमाने रकबी द फर्न हॉटेल येथे कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न झाला. राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. एसएमबीटी रुग्णालयाचे डॉ. संतोष पवार, डॉ. सुरज कडलग, संतोष भोसले, रफिक […]

गोंदे दुमाला येथे लंपी आजाराच्या प्रतिबंधासाठी लसीकरण सुरु : शरद सोनवणे, शोभा नाठे, गणपत जाधव यांच्या हस्ते झाली सुरुवात

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गोवंशातील जनावरांना लंपी आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु झाले आहे. गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे, उपसरपंच शोभा राजाराम नाठे, गणपत जाधव, कचरु धोंगडे यांच्या हस्ते आज लसीकरण सुरु करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश नेहते, सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डॉ. […]

पूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25 आपली पितरे अर्थात पूर्वजांची कृतज्ञता आणि आराधना करण्यासाठी पितृपक्षात त्यांना भोजन देण्याची सर्वत्र पद्धत आहे. काळानुरूप त्यामध्ये बदल होऊन अनेक पायंडे पडले आहेत. त्यानुसार पितृऋणातुन मुक्त होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी स्तुत्य काम केले आहे. त्यांचे वडील स्व. देवराम बोडके यांच्या पितृदिनाच्या निमित्ताने मोडाळे येथील जिल्हा परिषद शाळेला […]

error: Content is protected !!