
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथे तालुकास्तरीय बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी व विषय तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. मासिक पाळी व स्वच्छता व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धक आणि विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील मुलींचा सत्कार करण्यात आला. मुलीच्या जन्माचे स्वागत करून माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत कायम ठेव प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी. PCPNDT कायदा, शिक्षण हक्क कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोस्को कायदा, बाल संरक्षण समिती बाबत माहिती देण्यात आली. कनिष्का सविता भरत कोरडे या चिमुकल्या मुलीच्या नावाने झाड लावून त्या मुलीसोबत प्रमुख पाहुण्यांची सेल्फी घेण्यात आले. यावेळी बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, काळुस्तेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली ठाकरे-गायकवाड, विस्ताराधिकारी संजय मोरे, ए. मुंडे, चाईल्ड लाईनच्या प्रणिता मॅडम व इतर विभाग प्रमुख, विषय तज्ञ व सर्व पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामसेविका ज्योती केदारे यांनी तर आभार पर्यवेक्षिका अलका खांदवे यांनी मानले.