काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी ह्या दुर्गम गावात “चौपाल” सभा : बुधवारी ४ नोव्हेंबरला सायं ७ वाजता सभेचे आयोजन 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी ह्या दुर्गम आदिवासी गावात इंदिरा काँग्रेसकडून चौपाल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आदिवासी बांधवांसोबत विविध विषयावर दिलखुलास संवाद साधला जाणार आहे. न सुटलेले विविध प्रश्न, समस्या, सूचना समजून घेऊन त्यावर परिणामकारक कार्यवाही केली जाणार आहे. बुधवारी ४ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन ह्या कार्यक्रमाला लाभणार आहे. त्यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हजर राहणार आहेत. देशभरात ‘वोट बचाओ, देश बचाओ’ या अभियानांतर्गत विविध ठिकाणी ‘चौपाल सभां’चे (ग्रामसभा/बैठका) आयोजन करण्यात येत आहे. यानुसार कुरुंगवाडी येथील चौपाल सभा महत्वाची ठरणार आहे. ह्या कार्यक्रमाला काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, काँग्रेस नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष लकीभाऊ जाधव, इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे, जिल्हा सरचिटणीस आकाश पारख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कुरुंगवाडीचे सरपंच गोपाळ सावंत यांनी दिली. कोणत्याही मोठ्या डामडौलाशिवाय थेट गाव-पंचायतींमध्ये, गल्ली-बोळांत जाऊन स्थानिक नागरिकांशी खाटांवर (खाटा टाकून) बसून संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. या चौपाल सभांमधून गोळा केलेला डेटा आणि जनमताच्या आधारे दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने मोठ्या राष्ट्रीय सभेचे आयोजन केले जाणार आहे.

error: Content is protected !!