महाराष्ट्र राज्यातील सहाय्यक अभियंता श्रेणी-1 अभियांत्रिकी अधिकारी संघटना यातील एक अभ्यासू, चिकित्सक, निष्ठावंत, माहितीचा सागर व सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे इंजि. सचिन चौधरी साहेब ! गेल्या पाच-सहा वर्षाच्या काळात साहेबांनी संघटनेच्या चळवळीला ज्या पद्धतीने वाहून घेतले होते. अहोरात्र संघटनेच्या सदस्यांच्या हिताचाच विचार करून जी मेहनत व कष्ट घेऊन संघटनेचे बळ वाढविले, ते […]
खरपडी – खामशेत : मान्सून जोराने सक्रिय झालेला असून पेठ- हरसूल-त्र्यंबकेश्वरच्या पट्यात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे दमणगंगा नदीला पूर येऊन दुथडी भरून वाहत आहे. यातच निसर्गाने दमणगंगेला नेकलेस परिधान केल्याचं मनमोहक दृश्य खरपडी जवळ बघावयास मिळत आहे. छायाचित्र आणि व्हिडिओ : राहुल बोरसे, हरसूल ) व्हिडिओ पहा
लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटील, पत्रकारसंवाद : 9892162248 साधारण एक तप म्हणजे 12 वर्ष मी विविध वृत्तपत्रांचा मंत्रालय रिपोर्टर म्हणून काम केले.या दरम्यान असंख्य मंत्री,राज्यमंत्री आणि आमदार यांच्या जवळून संपर्कात होतो.काही तर माझे “ग्लासमेट” पण झाले होते. दारूबंदी व व्यसनमुक्ती या खात्याचे तर मी 3 मंत्री असे पाहिले की संध्याकाळ होताच त्यांचे हात थरथर कापत […]
लेखन :- जी. पी. खैरनार, नाशिक महाराष्ट्र राज्यात राजपत्रित वैद्यकीय अधिकारी यांना गट – ब मधून गट – “अ” श्रेणीत श्रेणीवर्धन करुन गट – अ श्रेणीचे वेतन मिळवून देणारे शिल्पकार तथा वैद्यकीय क्षेत्रातील महान तपस्वी डॉ. प्रकाश आहेर यांचे आज दुर्धर आजारपणामुळे दुःखद निधन झाले ही खूपच वेदनादायी व दुःख देणारी घटना आहे. नाशिक जिल्ह्यातील […]
लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटीलसंपादक, दै. अजिंक्य भारतसंवाद – 9892162248 अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना ज्योतिष हा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या, अर्थात हे काम तत्कालीन मानव संसाधन विकासमंत्री डॉ. मुरलीमनोहर जोशी यांचे होते. काही विद्यापीठांनी हा अभ्यासक्रम सुरु केला मात्र काही वर्षातच त्याच्या शाखा चालेना झाल्यात. हा अनुभव […]
लेखन – पुरुषोत्तम आवारे पाटीलदै. अजिंक्य भारत, अकोलासंवाद – 9892162248 जगात अनंत स्वभाव असणार्या व्यक्ती सर्वत्र नांदत असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आढळतात, याचा अनुभव आपणही कळत न कळत सातत्याने घेत असतो.नोकरी, व्यवसाय किंवा आणखी कोणत्या पेशात असणार्या व्यक्तींना आपण विविध कारणांनी भेटतो तेव्हा काही वेळाच्या संपर्कात आपल्याला त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो. काही व्यक्ती अशा भेटतात […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपटराव आणि सुलभा गवांदे यांची कन्या चि. सौ. कां. काजल हिचा शुभविवाह रामदास आणि शीला उगले रा. डोंगरगाव यांचे चिरंजीव दिगंबर यांच्यासोबत आज उत्साहात संपन्न झाला. संगमनेर येथील पाहुणचार लॉन्स येथे सकाळी साडेदहा वाजता संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभाशीर्वाद दिले.कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ बहुतांश लोकांचे बँकेत बचत खाते असते. मात्र त्या खात्याचा क्रमांक मात्र कधीच ध्यानात राहत नाही. अर्थातच खाते क्रमांक सुद्धा १० अंकांच्या पुढेच असतो. यामुळे लोकांना अनेकदा अडचणी आल्याशिवाय राहत नाही. अनेक बँक ग्राहकांना आपल्या स्वतःच्या आवडीचा, लक्षात राहणारा बँक खाते क्रमांक हवा असतो. तथापि निराशा येऊन खाते नंबर मिळत नाही. बऱ्याच […]
मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरे, मानसशास्त्रज्ञ वडील म्हणजे उंबराचं झाड असतं,लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं.. आईवडीलांबद्दल कितीही बोलले तरी ते कमीच आहे. दोघेही आपल्या मुलांना वाढविण्यासाठी मोठे करण्यासाठी, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेत असतात. त्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी इच्छा यांना मुरड घालतात. म्हणून आईवडील यांचे ऋण व्यक्त करायला अमेरिकेत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन […]
इगतपुरीनामा न्युज दि. 14: इको ट्रेनिंग सेंटर स्विडन, प्रादेशिक विद्या प्राधिकरण ( डाएट ) नाशिक, जिल्हा परिषद जळगांव आणि बांग्लादेश एलिमेंटरी इन्सिटीट्यूट तर्फे आयोजित भारत – बांग्लादेश टेलीकोलॅबोरेशन प्रोजेक्ट २०२१ मध्ये आपल्या इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिटोलीचे पदवीधर शिक्षक सिद्धार्थ सपकाळे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणीचे शिक्षक प्रदिप खैरनार यांनी सहभाग घेत […]