इगतपुरी तालुक्यासाठी सुवर्णसंधी : पाहिजे तसा आवडीचा बचत खाते क्रमांक हवायं ? ;आपल्या मोबाईल नंबरला खाते क्रमांक बनवाचयं ?

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

बहुतांश लोकांचे बँकेत बचत खाते असते. मात्र त्या खात्याचा क्रमांक मात्र कधीच ध्यानात राहत नाही. अर्थातच खाते क्रमांक सुद्धा १० अंकांच्या पुढेच असतो. यामुळे लोकांना अनेकदा अडचणी आल्याशिवाय राहत नाही. अनेक बँक ग्राहकांना आपल्या स्वतःच्या आवडीचा, लक्षात राहणारा बँक खाते क्रमांक हवा असतो. तथापि निराशा येऊन खाते नंबर मिळत नाही. बऱ्याच लोकांची आवडीच्या वाहन क्रमांकाची हौस भागवण्यासाठी अतिरिक्त रक्कम मोजायची सुद्धा तयारी असते. तसेच बचत खाते क्रमांक आवडीचा घ्यायची सुद्धा तयारी आहे. अशा परीस्थितीत Indusind बँकेने कोणत्याही नागरिकांना आपल्या आवडीचा १० अंकी बचत खाते नंबर देण्याची योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे यासाठी लोकांना काहीही अतिरिक्त रक्कम खर्च करण्याची गरज नाही. अर्थातच हे सगळं चकटफु मिळणार आहे. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील Indusind बँकेच्या शाखेत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

बचत खाते क्रमांक मोठे मोठे असल्याने अनेकांना ते ध्यानात राहत नाही. आपल्या स्वतःचा मनाजोगा बचत खाते क्रमांक मिळावा म्हणून अनेकांचा प्रयत्न असतो. आता यासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील Indusind बँकेच्या शाखेत आपल्याला आवडेल तो चॉईस खाते नंबर फुकटमध्ये मिळण्याची सुविधा सुरू आहे. आपला स्वतःचा १० अंकी मोबाईल क्रमांक, आवडणारे १० अंक, असे कोणतेही १० अंक खाते क्रमांक म्हणून दिले जात आहेत. अट मात्र एकच आहे की, हवा असलेला खाते क्रमांक कोणाला याआधी दिलेला नसावा. आवडीच्या दहा अंकी खाते नंबरच्या आधी १५ हा आकडा मात्र प्रत्येकाला घ्यावाच लागतो. त्यानंतरचे दहा अंक पाहिजे तसे मिळू शकणार आहेत.

बचत खात्यात किमान १५०० रुपये ठेवावे लागणार असून खाते उघडतेवेळी ३०५० रुपये खात्यावर टाकावे लागणार आहेत. बचत खात्यावर १ लाखांचा आत शिल्लक असेल तर ४ टक्के आणि १ लाखाच्या वर असेल तर ५ टक्के वार्षिक व्याज खात्यावर जमा होणार आहे. यासह बँकेकडे विविध योजना आहेत.
आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तात्काळ बचत खाते उघडले जाते. आधार, पॅन कार्ड मूळ प्रत सोबत ठेवावे लागेल. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर चार पाच दिवसात पोस्टाने एटीएम कार्ड, चेकबुक वगैरे बँकिंग किट आपल्या पत्त्यावर पाठवले जाते. अधिक माहितीसाठी इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील Indusind बँकेच्या शाखेत संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!