गवांदे – उगले विवाह सोहळा उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपटराव आणि सुलभा गवांदे यांची कन्या चि. सौ. कां. काजल हिचा शुभविवाह रामदास आणि शीला उगले रा. डोंगरगाव यांचे चिरंजीव दिगंबर यांच्यासोबत आज उत्साहात संपन्न झाला. संगमनेर येथील पाहुणचार लॉन्स येथे सकाळी साडेदहा वाजता संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभाशीर्वाद दिले.
कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्क, तापमान, ऑक्सिजन घेऊनच पाहुण्यांना प्रवेश देण्यात आला. यावेळी संगमनेर, अकोले, इगतपुरी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी वधू वरांना आशीर्वाद दिले. शिस्तबद्ध आणि अभूतपूर्व उत्साहात झालेल्या ह्या सोहळ्याचे मराठी पत्रकार संघाच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. उपस्थित मान्यवरांचे पत्रकार वाल्मिक गवांदे, ओंकार गवांदे यांनी आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!