साधूची संगत परमेश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग – गाथामूर्ती मनोहर महाराज सायखेडे

 लक्ष्मण सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. प्रत्येकाला एक दिवस मृत्यूचा सामना करावाच लागतो. साधूची  संगत परमेश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग असून, भगवंत मालक आहे. त्याच्या प्राप्तीसाठी अखंड चिंतन करावे असे प्रतिपादन गाथामुर्ती हभप मनोहर महाराज सायखेडे यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे कै. बबनराव वाळू गुळवे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त […]

तुकाराम बीजेच्या पर्वावरील हरिनाम सप्ताहाचे डॉ. लहवितकर यांच्याकडून कौतुक : वंजारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ प्रत्येकाचे आरोग्य चांगले रहावे ही जबाबदारी त्या गावच्या पुढाऱ्यांची आहे. जगी कीर्ती व्हावी या उक्तीप्रमाणे प्रतिष्ठा मिळावी यासाठी लोक कीर्तन करू लागले आहेत. नुसते कीर्तन न करता परमेश्वराची भक्ती देखील करावी असे आवाहन जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज यांनी केले. नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथे अखंड हरिनाम […]

जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग’ या इंग्रजी ग्रंथाचे देहू येथे प्रकाशन संपन्न

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ जगतगुरु तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमन या गूढ अदभुत विषयाबाबतचे सर्व प्रकारचे विकल्प आणि तर्क, संशय तसेच वैश्विक स्तरावरील जगभरातील लोकांना जाणीव होण्यासाठी निश्चितपणे या ग्रंथाचा उपयोग होईल अशी ग्वाही संतवीर हभप बंडातात्या कराडकर यांनी दिली. देहू येथे जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग’ या इंग्रजी ग्रंथाचे […]

‘जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग या इंग्रजी प्रबंधाचे १८ मार्चला देहू येथे प्रकाशन

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग’ या इंग्रजी प्रबंधाचे १८ मार्च रोजी देहू येथे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशित होणार असल्याची माहिती आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर जाधव यांनी दिली आहे. नाशिक येथील श्री क्षेत्र लहवित येथील संत […]

विविध पुण्यपावन तीर्थांचा रहिवास असणाऱ्या त्र्यंबकेश्वर पंचक्रोशीमध्ये पायी प्रदक्षिणा तीर्थयात्रा सोहळा : ६ ते १२ मार्चपर्यंत होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन

ज्ञानेश्वर मेढेपाटील : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पंचक्रोशीमध्ये सकळ ऋषि मुनिजन व अखिल देवदेवता वन, वृक्षवल्ली, पक्षी, मृत्तिका, पाषाण व खड्याच्या रूपाने राहतात. कोट्यवधी पुण्यपावन तीर्थांचा रहिवास या पंचक्रोशीमध्ये आहे. अशी अत्यंत दैदिप्यमान, पुण्यपावन व त्रिभुवनैक पवित्र त्र्यंबकेश्वरची पंचक्रोशी आहे. श्रीमन्निवृत्तिनाथांना समाधि देण्यासाठी आलेले सर्व संतसाधु व देवदेवता हे सप्तशृंगावरून पंचवटीला आले. […]

स्वतःसह सर्वांचे हित साध्य करण्यासाठी संत आणि संत साहित्याचे महत्व अबाधित – चैतन्य महाराज वाडेकर : स्व. ज्ञानेश्वर फोकणे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुश्राव्य कीर्तन संपन्न

आता तरी पुढे हाची उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ।।सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ।।हित ते करावे देवाचे चिंतन । करुनिया मन एकविध ।।तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ।। इगतपुरीनामा न्यूज, दि. २ स्वतःसह सर्वांचे हित साध्य करण्यासाठी संतसाहित्याचे महत्व अबाधित आहे. डोळे उघडून […]

संत निवृत्तीनाथांची महापूजा संपन्न : समाधी मंदिराचा २२ कोटी २३ लाख रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित –  आमदार हिरामण खोसकर

ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ त्र्यंबकेश्वर हे साक्षात कैलास असल्याची अनेक साधु महंत व वारकऱ्यांची भावना आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ हे विश्वगुरु असल्याने त्यांच्या समाधीमुळे त्र्यंबक पावन झाले आहे. ल्या समाधी मंदिराचा सर्वागिण विकास करण्यासाठी कटिबद्ध असून वारकऱ्यांना कायमस्वरूपी पायाभुत सुविधा  देण्यासाठी राज्य सरकारकडे २२ कोटी २३ लाख रुपयाचा विकास आराखडा प्रस्तावित आहे. त्यास […]

नामदेव नामदेव नामदेव नामदेव सगळीकडे फक्त नामदेवच….! मुंढेगाव येथील हरिनाम सप्ताहातील सर्व सेवा होणार फक्त नामदेव नावाच्या व्यक्तींकडूनच..!

१८ ते २५ जानेवारीला होणार नामदेव नावाचा अनोखा हरिनाम सप्ताह इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ प्रारंभापासून अखेरच्या दिवसांपर्यंत म्हणजेच ७ दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी फक्त “नामदेव” नावांचेच प्रवचनकार, कीर्तनकार, मृदंगमणी, गायक, टाळकरी, चोपदार, विणेकरी, अन्नदाते असणार आहेत. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील गतीर बंधू यांनी ह्या जगावेगळ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. १८ ते २५ […]

काल्याच्या किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता : दिंडीतील वारकरी फुगड्या व पावल्यांनी ग्रामस्थांचे वेधले लक्ष

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे सालाबादप्रमाणे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज काल्याच्या किर्तनाने झाली. अखंड २२ वर्षे चालणाऱ्या द्वितपपूर्तीकडे चाललेल्या सप्ताहात समाजप्रबोधन, स्त्रीभ्रूणहत्या, संस्कार आदी प्रबोधन करण्यात आले.सप्ताहात सुदाम महाराज गायकवाड, बाळासाहेब महाराज गतीर यांचे सुश्राव्य प्रवचन आयोजित करण्यात आले होते. कीर्तनप्रसंगी सुदाम महाराज गायकवाड, श्याम […]

बाल वारकऱ्यांना घडवणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेला गोरख बोडके यांच्या स्वखर्चाने हायमास्ट : आगामी काळात सभामंडप देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दिला शब्द

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ नव्या सदृढ समाजाची जडणघडण, सुसंस्कृत पिढीची निर्मिती आणि दूरगामी चांगले फळ देणाऱ्या अध्यात्माची पेरणी स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यात होत आहे. बाल वारकऱ्यांना घडवणाऱ्या ह्या संस्थेसाठी आगामी काळात सभामंडप देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी दिला. बलायदुरी येथील स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेला गोरख बोडके […]

error: Content is protected !!