
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे शनिवारी २ एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज यांच्या शुभप्रेरणेने व मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. विठू नामाच्या जयघोषाने सुरू होणाऱ्या सप्ताहात कृष्णा महाराज कमानकर, सागर महाराज दिंडे, सुनील महाराज मंगळापूरकर, विवेक महाराज केदार, ज्ञानेश्वर महाराज तुपे, रामायणाचार्य नवनाथ महाराज म्हस्के, रामानंदगिरीजी महाराज अशा नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. याबरोबरच शनिवारी ९ तारखेला सकाळी नऊ ते अकरा जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
ह्या काळात प्रात:काली काकडा भजन, सायंकाळी ५ ते ६ सामुदायिक हरिपाठ, रात्री नऊ ते अकरा कीर्तन, नंतर हरिजागर हे रोजचे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहात पंढरी महाराज सहाणे, ज्ञानेश्वर महाराज तुपे मार्गर्शन करणार आहेत. या हरिनाम सप्ताहासाठी उपस्थित राहावे असे आवाहन लोहशिंगवे येथील गोरक्षनाथ भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे