जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग’ या इंग्रजी ग्रंथाचे देहू येथे प्रकाशन संपन्न

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

जगतगुरु तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमन या गूढ अदभुत विषयाबाबतचे सर्व प्रकारचे विकल्प आणि तर्क, संशय तसेच वैश्विक स्तरावरील जगभरातील लोकांना जाणीव होण्यासाठी निश्चितपणे या ग्रंथाचा उपयोग होईल अशी ग्वाही संतवीर हभप बंडातात्या कराडकर यांनी दिली. देहू येथे जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग’ या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते. नाशिक येथील श्री क्षेत्र लहवित येथे राहत असलेले संत वाङमय व भारतीय तत्वज्ञानाचे थोर अभ्यासक व संशोधक म्हणून परिचित असलेले जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या लेखणीतून ‘जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग’ या ग्रंथाची निर्मिती नुकतीच झाली आहे. हा ग्रंथ मुंबईच्या डॉ. विजयराव पाटील यांनी इंग्रजीत अनुवादित केला आहे. या शोधप्रबंध ग्रंथाचा प्रकाशन समारंभ मोठ्या उत्साहात देहू येथे  पार पडला.

यावेळी आचार्य डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांनी ग्रंथाचा आशय सविस्तरपणे मांडला तर इंग्रजी अनुवादक डॉ. विजय पाटील यांनी इंग्रजी ग्रंथाविषयी माहिती दिली. याप्रसंगी देहू संस्थान अध्यक्ष व संत तुकाराम महाराजांचे वंशज नितीन महाराज मोरे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष कुलगुरू प्रकाश महाराज बोधले, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष राजने महाराज, डॉ. नारायण जाधव, प्रमोद जगताप,  बाजीराव चंदीले, नरहरी चौधरी, विजू अण्णा जगताप, राजेंद्र सोळसकर यांसह राज्यभरातील मान्यवर वारकरी सांप्रदायिक प्रभूती व अभ्यासक तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!