लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग’ या इंग्रजी प्रबंधाचे १८ मार्च रोजी देहू येथे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशित होणार असल्याची माहिती आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर जाधव यांनी दिली आहे. नाशिक येथील श्री क्षेत्र लहवित येथील संत वाङमय व भारतीय तत्वज्ञानाचे थोर अभ्यासक व संशोधक म्हणून परिचित असलेले जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या लेखणीतून ‘जगतगुरु भक्तियोगी श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन ऐश्वर्ययोग’ या ग्रंथाची निर्मिती झाली आहे.
या ग्रंथामुळे संत तुकाराम महाराज यांचे जीवन व तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार वैश्विक पातळीवर होण्यास हातभार लागणार आहे. या ग्रंथाचे मुंबईच्या डॉ. विजयराव पाटील यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या ‘Sadeha Vaikunthagamana of Jgataguru Bhaktiyogi Shri Tukarammaharaj : Aishvaryyoga’ ( Reserch Oriented Interpretation ) या शोधप्रबंध ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार १८ मार्चला दुपारी ४ वाजता श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिराजाच्या सभामंडपात होणार आहे. यावेळी देहू संस्थान व संत तुकाराम महाराजांचे वंशज मंडळी यांसह राज्यभरातील मान्यवर वारकरी सांप्रदायिक प्रभूती व अभ्यासक तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत