
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – गुरुवर्य हभप एकनाथ बाबा चव्हाण यांच्या कृपाशीर्वादाने इगतपुरी तालुक्यातील ३५० साधकांचा सत्संग सोहळा श्रीक्षेत्र नैमिषारण्य, श्री क्षेत्र अयोध्या, श्री क्षेत्र प्रयागराज, श्री क्षेत्र चित्रकुट, श्री क्षेत्र काशी, श्रीक्षेत्र गया या पवित्र पुण्यभुमीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील नामवंत प्रवचन कीर्तनकारांनी आपल्या अमृत वाणीतुन समाज प्रबोधन केले. हभप चंदर महाराज चव्हाण यांच्या काल्याच्या कीर्तनाने सत्संगाचा समारोप झाला. ह्या सत्संग सोहळ्याच्या निमित्ताने देशातील पवित्र तिर्थक्षेत्रात सामान्य साधकांना पवित्र पुण्यभुमीचे दर्शन मिळाले. जीवनात याठोकणी पवित्र पुण्यप्राप्ती व्हावी संकल्पना साध्य झाली. इगतपुरी तालुक्यातील ३५० साधकांना दुरवरच्या भुमीत नेणारा हा पहिलाच सत्संग सोहळा आहे. सर्व साधकांनी नामस्मरण आणि भक्तीच्या माध्यमातून या सर्व पवित्र तिर्थक्षेत्राचा लाभ घेतला. या सत्संग सोहळ्याचे उत्तम नियोजन हभप चंदर चव्हाण, हभप चिंधु आप्पा आडोळे, दत्तात्रय धोंगडे, अशोक खुर्दळ, भोलेनाथ चव्हाण, निवृत्ती चव्हाण, प्रल्हाद भटाटे, गणपत जाधव, संतोष चव्हाण, उत्तम दर्वे, बाळकृष्ण जोशी, रतन तोकडे, भगवान तोकडे, शिवशंकर आंबोळे, रामदास कणसे आदींनी केले.

