बंद हरिनाम सप्ताह सुरू करण्यासाठी आवश्यक सहाय्य करणार : गोकुळ महाराज पुंडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ – अनेक गावांत वारकरी सांप्रदायिक नामजप यज्ञ असणारे अखंड हरिनाम सप्ताह गावांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे बंद पडत आहेत. वारकरी सांप्रदायाची पताका मजबूत करून हरिनामाचा जागर करण्यासाठी ह्या सप्ताहांचे मोठे योगदान आहे. बंद असणारे सप्ताह सुरू करण्यासाठी आर्थिक घडी बिघडलेल्या गावांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप भागवताचार्य युवाकीर्तनकार गोकुळ महाराज पुंडे यांनी केले आहे. काही अडचणीमुळे सप्ताह बंद पडलेला असेल किंवा सप्ताह सुरू नसेल तर त्या गावात सप्ताह सुरू करण्यास योगदान देऊ. आर्थिक परिस्थिती नसेल तर विनामूल्य कीर्तनकार, गायक, वादक उपलब्ध करून देणार असल्याचे भागवताचार्य पुंडे महाराज यांनी सांगितले. वारकरी संप्रदाय गावागावात पोहचावा हा आमचा उद्देश असून 8668472511 ह्या क्रमांकावर तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!