इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – गुरुवर्य हभप एकनाथ बाबा चव्हाण यांच्या कृपाशीर्वादाने इगतपुरी तालुक्यातील ३५० साधकांचा सत्संग सोहळा श्रीक्षेत्र नैमिषारण्य, श्री क्षेत्र अयोध्या, श्री क्षेत्र प्रयागराज, श्री क्षेत्र चित्रकुट, श्री क्षेत्र काशी, श्रीक्षेत्र गया या पवित्र पुण्यभुमीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील नामवंत प्रवचन कीर्तनकारांनी आपल्या अमृत वाणीतुन समाज प्रबोधन केले. हभप चंदर महाराज […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – इगतपुरी येथील जोग महाराज भजनी मठाच्या इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर पायीदिंडीचे पाडळी देशमुख येथे लेझीम पथकासह भव्य गोल रिंगण सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांनी स्वागत करण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या महावारी निमित्ताने इगतपुरी येथील जोग महाराज भजनी मठातुन मठाधिपती गुरुवर्य माधव महाराज घुले यांच्या मार्गदर्शनाने दरवर्षी इगतपुरी […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – शरीर उत्तम चांगले.. शरीर सुखाचे घोसूले.. शरीरे साध्य होय केले.. शरीरे साधीले परब्रम्ह.. ह्या संतवचनाप्रमाणे अवघे आयुष्य परमार्थ करण्यासाठी देणारे विरळे.. युक्त आहार विहार आणि परमेश्वराचे नामस्मरण करता करता आपल्या विचारांचा वारसा भक्कमपणे सुरु ठेवणारे तर दुर्मिळच.. असेच तरुणांनाही लाजवेल असे ९४ वर्षीय व्यक्तिमत्व इगतपुरी तालुक्यातील तळोशी […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – गुरुदेव गुरुदत महाराज जन्मोत्सवाच्या आनंदी पर्वावर महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी इगतपुरी येथील कानिफनाथ महाराज मठात हजेरी लावली. मागील आठवड्यापासून सुरु झालेला सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा दिमाखात संपन्न करण्यात आला. सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांच्या सुमधुर गीतांचा आस्वाद भाविकांना मिळाला. आज सकाळपासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..कानिफनाथ […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 9 कलियुगात काळ पाठीमागे लागला आहे. मरणाची तयारी कुणीही करीत नाही. मृत्यू लोकांत दोन दिवस आहे. परमेश्वराला शरण जावे ही श्रीमद भागवत कथा आहे.हिऱ्याची व काचेची बरोबरी होत नाही. त्याचप्रमाणे पाप पुण्याची बरोबरी होत नाही. श्रीमद भागवत कथा अमृत असून अनंत आहे. भगवंताचे नामसमरण केल्याने पापाचा नाश होऊन उद्धार […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 संतस्वरूप सज्जन व्यक्तिमत्वे ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरचे दिपस्तंभ आणि कल्पतरू आहेत. निरामय, निरपेक्ष स्नेह देणारे कारभारी दादांसारखे सज्जन व्यक्तिमत्व सर्वांना प्रगतीची वाटचाल करायला शिकवतात. लोकांच्या हृदयात असलेल्या पांडुरंगाशी एकरूप होऊन मनापासून सेवेचे पुण्यकर्म करतात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी चांगले कर्म करून संतस्वरूप कार्याचा आलेख उभा केला असे कारभारी ( दादा ) गिते हे […]
वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 3 इगतपुरीतील अतिप्राचीन मंदिरातील १०० वर्षापुर्वीच्या जीर्ण झालेल्या महादेवाच्या मुखवट्याचे नुतनीकरण व प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. पालखी उत्सवात श्रींचा हा मुखवटा वापरला जातो. याप्रसंगी श्रींच्या मुखवट्याची पालखीतुन भव्य मिरवणुक काढून प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मिरवणुकीत श्री महादेव मंदिर ट्रस्ट, चितामण बगाड, माजी नगराध्यक्ष […]
सह्याद्रीच्या कुशीत नाशिक व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर धानोशी ठोकळवाडी ह्या गावी डोंगरातील गुहेत जागृत स्वयंभू आई चौराई मातेचे नैसर्गिक मंदिर आहे. जे एकमेव देवस्थान असेल जेथे गुहेत उंच डोंगराच्या पोटी बारमाही पाणी असलेली गुहा आहे हे विशेष..! मंदिरात जाण्यासाठी टाकेद परिसरातील धानोशी गावातून थेट डोंगर चढून वर जावे लागते. धानोशी ठोकळवाडी गावची ग्रामदैवत असलेली चौराई […]
निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरुन दिलेली वनराई…मंद मंद धुंद करणारा पाऊस…घनदाट वृक्षांची छाया…मुक्तहस्ते निर्मित धबधबे…खोल खोल दऱ्या…हंबरत हंबरत मंजुळपणे चरणारी गायी गुरे…किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे…रानफुलांचा मंद मंद सुगंध…पर्यटकांसह भाविकांचे असे अनेकानेक अंगांनी नटुन थटुन स्वागत करणारा कसारा घाट.. धार्मिकता नसानसात भरलेला भक्तांचा समुदाय…देवीचा उदो उदो करणारे भोळे आदिवासी भक्त… अशाच अनेक कारणांनी भीमाशंकरच्या […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 22 शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून एकजुटीने नवरात्र उत्सव साजरा करावा असे आवाहन वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी केले. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या गावातील नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी अनिल पवार बोलत […]