इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील जागृत ग्रामदेवता भवानी माता जंगी यात्रोत्सवाचे उद्या गुरुवारी हनुमान जयंती निमित्ताने ६ एप्रिलला आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत गोंदे दुमाला आणि ग्रामस्थांनी केले आहे. उद्या दुपारी ३ ते ४ पर्यंत उपस्थित मान्यवरांना फेटे बांधणे, मारुतीराया आणि रथ पूजन, दुपारी ४ वाजता संपूर्ण गावातून हत्ती, घोडे, उंट यांची भवानी माता मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत न्यू इंग्लिश स्कुल तळेगाव यांचा लेझीम पथकाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर कळवणकरांचा बोहड्याचा कार्यक्रम, दिंडोरीकर यांचे अश्व नृत्य, साल्हेर किल्ल्याचे पावरी नृत्य, रात्री साडे सात वाजता भवानी मातेची महाआरती आणि ओटीभरण होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी ७ एप्रिलला विविध खेळांचे आयोजन केले आहे. पंचक्रोशीतील खेळ प्रेमींनी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा आणि यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत गोंदे दुमाला, समस्त ग्रामस्थांनी यांनी केले आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group