
इगतपुरीनामा न्यूज -आध्यात्मिक बालसंस्कार शिबिरातून मुलांना संस्काराचे ज्ञानदान मिळते. उन्हाळी सुट्टीत बालकांचा वेळ पारमार्थिक कार्यात सत्कारणी लागत असल्याने भावी पिढीला वारकरी संप्रदायाचा वारसा जपता येईल. स्वराज्यप्रमुख संभाजी राजे छत्रपती, स्वराज्यचे प्रवक्ते करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन स्वराज्यचे युवा तालुकाध्यक्ष तथा शिव भोले हॉटेलचे संचालक गोकुळ धोंगडे यांनी केले. शिरेवाडी येथे मठाधिपती हभप माधव महाराज घुले, विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, अशोक पांचाळ गुरुजी यांच्या आशीर्वादाने श्री संत गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेचे हभप गणेश महाराज मालुंजकर यांनी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात स्वराज्य संघटना व पिंपळगाव मोरचे सामाजिक कार्यकर्ते निलेश कांतीलाल काळे यांनी मुलांना गोड भोजनाची पंगत दिली. शिबिराचे आठवे वर्ष असून सामाजिक कार्यकर्ते वैभव काळे, संकेत काळे, सुरेश मेंगाळ, संदीप लाळगे, जयराम काळे यांनी परिश्रम घेतले. शिबिराला भजनसम्राट कल्याण पेखळे, पखवाज वादक गणेश महाराज मालुंजकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बालसंस्कार शिबिराचे नियोजन तुषार महाराज पाटील, पुरुषोत्तम महाराज टिळे, भानुदास लिलके, करण वाखेरे आदींनी केले आहे. गोड भोजनाचा आस्वाद मिळाल्याने मुलांनी स्वराज्य संघटनेचे आभार मानले. तालुकाध्यक्ष नारायण भोसले, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा वारकरी परिषदेचे अध्यक्ष नारायण जाधव, उपजिल्हाध्यक्ष डॉ. महेंद्र शिरसाठ, युवा तालुका शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष शिवाजी काजळे, आरोग्य चिटणीस जालिंदर कार्ले, हरीश कुंदे, उपतालुकाध्यक्ष सखाराम गव्हाणे, माजी उपसरपंच गौतम भोसले, घोटी गटप्रमुख बाळु सुरुडे, तालुका संघटक कृष्णा गभाले, सामाजिक कार्यकर्ते सागर गावंडे, गणेश सहाणे, अरुण जुंद्रे, ईश्वर भोसले, बहिरू भोसले, दीपक खातळे आदींनी बालसंस्कार शिबिराच्या आयोजकांचे कौतुक केले.