रामनवमीनिमित्ताने इगतपुरी शहरात चिमुकल्यांनी वेशभूषा करून काढली शोभायात्रा : जय श्रीरामच्या जयघोषाने इगतपुरी झाली चैतन्यमय

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ – इगतपुरी येथील नूतन मराठी शाळेत रामनवमी निमित्त सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण कार्यक्रमाचचे आयोजन करण्यात आले. ह्या कार्यक्रमात अंगणवाडी ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राम, सिता, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदवला. यावेळी सामूहिक सुरया रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात आले. या चिमुकल्यांनी शहरातून जय श्रीरामच्या घोषणा देत प्रभू श्रीरामाची शहरातून सवाद्य पालखी शोभायात्रा काढली. पालखी मार्गक्रमण करत असतांना अनेक नागरिकांनी चिमुकले राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांचे मोहक रूप आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. काहींना सेल्फी काढायचा मोह आवरता आला नाही. या पालखी शोभायात्रेमुळे इगतपुरी शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. शोभायात्रा नूतन शाळेत पोहचल्यानंतर आरती होऊन प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व धर्मीय बांधवांनी सहभाग नोंदवला.

Similar Posts

error: Content is protected !!