इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – सलाम मुंबई फाऊंडेशन, एव्हरेस्ट फाऊंडेशन व महाराष्ट्र शासनातर्फे उद्या मंगळवार ३१ जानेवारीला आंतरराज्यस्तरीय तृतीय एव्हरेस्ट बालपरिषद ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. या बालपरिषदेसाठी इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम अवघड क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील अंकुश ढवळू दरवडे या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. अंकुशला या परिषदेत शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळाली […]
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – मुलींचे शिक्षण सुलभ व्हावे म्हणून शासनाच्या मानव संसाधन उपक्रमांतर्गत मुकणे येथील महर्षी पुंजाबाबा गोवर्धने विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या. याआधी इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक सायकल गोवर्धने विद्यालयातील विद्यार्थ्यांनाच मिळाल्या आहेत. याबाबत उपस्थितांनी सर्व शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी शाळेत ये-जा करतांना रस्त्यावरून नियमांचे पालन आणि महामार्गावरील भुयारी मार्गाचा […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – धामडकीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शाळेतील सर्व माता व ग्रामस्थ या मेळाव्यास उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला प्रारंभ झाला. राज्य आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी निपुण भारत अंतर्गत विद्यार्थी अध्ययन स्तर प्रगती बाबतची माहिती मातांना दिली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथे ग्रामपंचायतीतर्फे माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत विविध स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये चित्रकला, कबड्डी, खो खो, वक्तृत्व, गायन, डान्स, सायकल स्पर्धा, हरित सणांतर्गत बैल पोळा पेंटिंग ह्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आली. सरपंच मालन भगवान वाकचौरे, उपसरपंच आशा […]
इगतपुरीनामा न्यूज दि. २६ : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिरमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर स्कूल कमिटीचे अध्यक्ष कोशिरे तसेच स्कूल कमिटीचे सर्व सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, माता पालक व पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष, सदस्य, न्यू मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक साळवे, शाळेच्या […]
लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – विद्यार्थ्यांना सुसंस्काराने घडवण्याचे महत्वपूर्ण काम शाळा करीत असते. त्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नूतन इमारत बांधली जात आहे. यामुळे अध्ययन, अध्यापन करणे सोपे होणार असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडण्यास मोठी मदत मिळणार आहे. म्हणूनच नवीन शाळेच्या इमारतीचे काम अधिकाधिक सुंदर करण्यावर आमचा कायमच भर राहील. असे प्रतिपादन संचालक विशाल गाडेकर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – नाशिकचे शालेय विद्यार्थी असलेल्या एका बसला इगतपुरी तालुक्यात अपघात झाला आहे. सर्वतीर्थ टाकेद भागात म्हैसवळण घाटात अपघाताची घटना घडली आहे. अपघातात ४ विद्यार्थी गंभीर तर ३ जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. जखमींना धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असून बसचालकाने […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – अंधेरी मुंबई येथील वेदांत तायक्वांदो अकॅडमीतर्फे ग्रीन १, यलो, ब्लू, रेड बेल्टचे वितरण करण्यात आले. न्यूज सेव्हन मराठीचे संचालक पत्रकार राजु देवळेकर यांच्या हस्ते बेल्ट वितरण करण्यात आले. मुंबई भायखळा आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ हायस्कूल मधील विद्यार्थिनींना प्रशिक्षणानंतर बेल्टचे सन्मानपूर्वक वितरण संपन्न झाले. वेदांत तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक तथा प्रशिक्षक रोहिदास […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – युवती आणि महिलांसाठी अनेक प्रकारच्या विविध संधी वाट पाहत आहेत. जिद्ध, महत्वाकांक्षा आणि गगनभरारी घेण्याची उर्मी आत्मनिर्भर करण्यासाठी उपयुक्त ठरेल. सगळ्या संधीचे सोने करून महिलांनी उद्योजिका होण्याचे मोठे स्वप्न पाहून त्याच्या पूर्णत्वासाठी झोकून द्यावे. येणारा काळ तुमच्या यशस्वी कारकिर्दीसाठी यशकारक ठरणार असे प्रतिपादन उद्योयिका नेहा खरे यांनी केले. गोखले एज्युकेशन […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १० – इगतपुरी शहरातील जसपिंदरदीप सिंग जस्विर सिंग संघा याने सनदी लेखापाल परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या यशामुळे इगतपुरी तालुक्यात त्याचे कौतुक होत आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील या २४ वर्षीय तरुणाने रोज १२ तास अभ्यास करून हे यश संपादन केले. या यशामागे आई वडिलांची प्रेरणा असल्याचे त्याने सांगितले. जसपिंदरदीप सिंग याचे […]