इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी तालुक्यातील एक हात मदतीचा या सामाजिक उपक्रमांतर्गत नाभिक समाजातील गरीब विद्यार्थ्यांना सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. घोटी येथील श्री संत सेना महाराज मंदिरात ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता १ ते १० वी मधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा ३ वर्षाचा शालेय शिक्षणाचा संपूर्ण खर्च, वह्या, पुस्तके आदी खर्चाची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनने स्वीकारली आहे. घरातील कर्ता पालकाचे निधन झाल्याने त्यांच्या मुलांचे शैक्षणिक अस्तित्व धोक्यात येऊ नये, अशा मुलांना शिक्षण देऊन त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे हा आमचा उद्देश असल्याचे सलून असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ॲड. सुनील कोरडे यांनी सांगितले
कोरोनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने, समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन एक हात मदतीचा हा उपक्रम सुरु झाला आहे. ज्या आई वडिलांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे, ज्या मुलांना आई वडील नसतील किंवा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे अशा मुलांचे शैक्षणिक पालकत्व” स्विकारण्याचा निर्णय भगवान आण्णा बिडवे यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला होता. या माध्यमातून नाभिक एकता महासंघ संलग्न सलून असोसिएशनच्या वतीने मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कोमल हास्य उमटले. यावेळी जिल्हाध्यक्ष पत्रकार एकनाथ शिंदे, प्रदेश संघटक पंढरी आंबेकर, जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती आंबेकर, अशोक सुर्यवंशी, सल्लागार ॲड. सुनिल कोरडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रेवणनाथ सोनवणे, जिल्हा संपर्कप्रमुख अक्षय दळवी, इगतपुरी तालुकाध्यक्ष मच्छिद्र कोरडे, उपाध्यक्ष गणेश रायकर, उपाध्यक्ष विशाल कदम, सरचिटणीस किरण कडवे, अनिल सुर्यवंशी, कैलास जाधव, भुषण डाके, प्रविण काशीकर, प्रदिप कडवे, योगेश कोरडे, पत्रकार लक्ष्मण सोनवणे, आदेश जाधव, सुनिल वाघमारे, राजाराम बिडवे, गणेश गेणु रायकर, योगेश आंबेकर, गणपत रायकर, सुर्यकांत कोरडे, संजय सोनवणे, सोमनाथ साळुंके, ज्ञानेश्वर रायकर, संकेत कोरडे, नवनाथ सोनवणे, वैभव कोरडे, संतोष दत्तू सोनवणे आदी उपस्थित होते.