ब्रेकिंग न्यूज : सोमवारपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारची सशर्त परवानगी

इगतपुरीनामा न्यूज दि. २० : जेमतेम काही दिवस सुरू असलेल्या राज्यातील शाळा कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आज झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत येत्या सोमवार पासून राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली असून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून शाळा सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. मात्र यासाठी कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचे बंधन घालून दिले असून ज्या ठिकाणी रुग्णसंख्या नियंत्रणात आहे अशाच ठिकाणी शाळा सुरू करता येतील असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रात स्वागत केले जात असून ग्रामीण भागातील बहुतांश शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागात अजून तरी रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सोमवार पासून पुन्हा सुरू होतील असे चित्र सध्या तरी दिसते आहे. दरम्यान दहावी बारावीच्या जवळ आलेल्या परीक्षा लक्षात घेता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन वर्ग सुरू होणे गरजेचे होते, त्या दृष्टीने आज सकारात्मक निर्णय झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!