इगतपुरीनामा न्यूज – आपल्या गावाच्या विकासासाठी अनेकांना ग्रामपंचायतीची निवडणुक लढायची असते. यावर आपला वरचष्मा राखण्यासाठी अनेकानेक प्रकारे क्लुप्त्या वापराव्या लागतात. मतदार अर्थात गावकरी आणि युवकांची मर्जी संपादन करावी लागते. थेट सरपंचपद आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून यावे यासाठी सर्वांगीण प्रयत्न केले जातात. उपसरपंच पदासाठी निवडणुकीनंतर प्रयत्न केला जातो. मात्र ही निवडणुक लढवण्यासाठी निवडणुकीची घोषणा झाल्यावर […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील २३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण आज निश्चित करण्यात आले. इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर यांनी याबाबत झालेल्या बैठकीत आरक्षण निश्चित केल्याची घोषणा केली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुका घोषित होण्याची दाट शक्यता असून ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका एकाचवेळी घोषित होण्याचा अंदाज आहे. बराच काळ प्रशासकीय राजवट असल्याने ग्रामीण भागातील राजकारण […]
इगतपुरीनामा न्यूज – पिंपळगाव मोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या २०२२ ते २०२७ काळासाठी संचालक मंडळ निवडीसाठी १५ मे २०२२ ला निवडणूक झाली होती. ह्या निवडणुकीत १२ संचालक निवडून आले परंतु ह्या संचालक मंडळाने ६० दिवसात निवडणूकीचा खर्च निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला नाही. म्हणून संस्थेचे सभासद युवराज तुकाराम गातवे यांनी सहाय्यक निबंधक इगतपुरी […]
इगतपुरीनामा न्यूज – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सदस्य नोंदणी व पक्षप्रवेश अभियान सुरू केले आहे. या अनुषंगाने इगतपुरी तालुका पूर्व भागाची भाजपची कार्यशाळा उत्साहात झाली. त्यात पक्ष संघटन व पदाधिकारी यांच्या नियुक्त्या वाटप करण्यात आल्या. पूर्व विभागाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब धोंगडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – तत्कालीन राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद गटांची संख्या पूर्वीप्रमाणे करण्याचा अध्यादेश, न्यायालयीन लढाई, ओबीसी आरक्षणाचा तिढा यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुका राज्यभर रखडलेल्या आहेत. त्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीमुळे ग्रामपंचायत निवडणुकाही प्रलंबित आहेत. इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट, १० पंचायत समिती गण, ६५ ग्रामपंचायती आणि इगतपुरी नगरपरिषद […]
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील ७ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आणण्यात राष्ट्रवादीचे नेते छगनराव भुजबळ यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वाने महायुतीसाठी भक्कम अशी मदत झाली. यासह श्री. भुजबळ हे अत्यंत अनुभवी आणि विकासपुरुष म्हणून ओळखले जातात. नाशिक त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा जागतिक पातळीवर त्यांच्यामुळेच यशस्वी होऊ शकला. नाशिक जिल्ह्याच्या विकासात अत्यंत मोठे […]
इगतपुरीनामा न्यूज – विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा हाती घेत जनतेमध्ये महायुतीने केलेल्या कार्याचा प्रचार प्रसार करण्याचे काम केले. त्याचा फायदा होऊन पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत युवकांना संधी देणार असल्याचे प्रतिपादन ना. छगन भुजबळ यांनी केले. जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या […]
इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच नाशिक जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणाबाबत राजपत्रात माहिती दिली आहे. नाशिक जिल्ह्यात बिगर अनुसूचित क्षेत्रातील एकूण ग्रामपंचायती १०६, अनुसूचित जातीसाठी आरक्षित एकूण सरपंचपद ८ ( पैकी महिलांसाठी ४ ), अनुसूचित जमातीसाठी आरक्षित एकूण सरपंचपद १३ ( पैकी […]
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे इगतपुरी तालुक्यातील अनेक महत्वपूर्ण ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता निवडणुका घेण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याने लवकरच ह्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता वाढली आहे. इगतपुरी तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी आगामी काळात सुरु होणार असल्याची चिन्हे आहेत. सध्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हातात असून यामुळे अनेक […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या १७ उमेदवारांपैकी महायुतीचे हिरामण खोसकर यांनी प्रचंड मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव केला. ह्या सामन्यात त्यांनी सर्वच्या सर्व १६ जणांचे डिपॉझिट जप्त करून टाकले. राष्ट्रीय, राज्य पातळीवरील पक्षाच्या उमेदवाराला आणि सर्व अपक्ष उमेदवारांना या सामन्यात डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आली. निवडणुकीत उतरण्याचे काही नियम असतात. त्यातीलच एक महत्त्वाचा […]