
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ इगतपुरी तालुक्यात अनेक गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. आज पाडळी फाटा येथे मुकणे ग्रामस्थांनी घोषणाबाजी करून आमदार, खासदार व पुढारी यांना गावबंदी केल्याचे बॅनर लावून करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. मुदत देऊनही शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसल्याने त्यांच्या समर्थनार्थ गावोगावी बैठका घेऊन लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पुढारी यांना गावबंदी करण्यात येत आहे. ह्या पार्श्वभूमीवर मुकणे ग्रामस्थांनी एकमताने पाडळी फाटा येथे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पुढारी यांना गावबंदी करण्यात येत असल्याचे बॅनर लावुन शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा जाहीर करीत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुकणेचे सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, गणेश राव, गोकुळ राव, लकी राव, भाऊसाहेब वेल्हाळ, उत्तम गायकर, तुकाराम राव, ज्ञानेश्वर राव, गोरख गायकर, बबन जाधव, दतु बोराडे, दशरथ बोराडे, नामदेव राव, भाऊसाहेब शिंदे, भालचंद्र जाधव, समाधान राव, राजाराम धांडे आदींसह मुकणे व पाडळी देशमुखचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.