
इगतपुरीनामा न्यूज – मराठा आरक्षणाचा लढा महाराष्ट्रामधे जोर घेत असून याला इगतपुरी तालुक्यात विविध गावांनी समर्थन दिले आहे. त्यानुसार मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा समर्थनार्थ गोंदे दुमाला येथे सामाजिक कार्यकर्ते रतन नाठे आणि ग्रामस्थांनी अन्नत्याग करीत उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी कडक भूमिका यावेळी घेण्यात आली.गोंदे दुमाला ही औद्योगिक वसाहत आणि मध्यवर्ती गाव असुन येथे घेतलेला निर्णय परिसरात वाऱ्यासारखा पसरला आहे. त्यामुळे या उपोषणाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. परिसरातून ह्या उपोषणाच्या ठिकाणी नागरिक गर्दी करीत आहे. ह्या आंदोलनात सर्व ग्रामस्थ माझ्या सोबत असल्याचे रतन नाठे यांनी सांगितले. याप्रसंगी रमेश नाठे, गोपाळ नाठे, केशव नाठे, शरद सोनवणे, मोहन जाधव, गणेश नाठे, सुनील नाठे, रामदास सोनवणे, कुंडलिक धोंगडे, भाऊसाहेब कातोरे, जीवन नाठे, धनंजय नाठे, विशाल जाधव, हर्षद भागवत आदी हजर होते.