
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या रंजना विनायक लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला समर्थन म्हणून राजीनामा दिला आहे. धामणी ह्या गावात मराठा समाजाचे प्राबल्य असून गावात नाथपंथी गोसावी समाजाचे एकच घर आहे. असे असतांना सर्व मराठा समाजाने ग्रामपंचायतीत संधी देऊन पद सुद्धा मिळवून दिले. यासह पती विनायक लाड यांनाही सहकारी सोसायटीचे व्हॉइस चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली. मराठा समाजाने आमच्यावर अनंत उपकार केले असून त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. म्हणून समाजाचा नितांत आदर ठेवून सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला समर्थन म्हणून सदस्य पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले. नाथपंथी गोसावी समाजाच्या लोकप्रतिनिधीने मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. याबद्धल इगतपुरी तालुक्यातील सकल मराठा समाजाने रंजना लाड यांचे कौतुक केले आहे. आजच गोंदे दुमाला येथील दीपिका शरद नाठे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.