घोटी टोल नाक्यावर मनसेचे जोरदार आंदोलन ; शेकडो वाहने टोल न भरताच रवाना

इगतपुरीनामा न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व टोलनाक्यावरुन तीन चाकी, चार चाकी वाहनांकडुन कोणताही टोल आकारला जात नसुन केवळ कमर्शियल वाहन धारकांकडुन टोल आकारला जात आहे. हाच धागा पकडुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस खोटी माहिती देत असुन कोणत्याही टोलनाक्यावरून चार चाकी वाहने मोफत सोडली जात नाही. यामुळे मनसेच्या वतीने महाराष्ट्रभर टोल नाक्यावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी टोल नाक्यावरही उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, तालुकाध्यक्ष रामदास आडोळे उपस्थित होते. मुंबई ते नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य असतांना टोल वसुली तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे शेकडो वाहने टोल न भरताच सोडण्यात आली. या आंदोलनात कृष्णा भगत, योगेश गायकवाड, सत्यम काळे, पंकज देशपांडे, राजीव राखेचा, भरत भागडे, प्रताप जाखेरे, विलास भगत, जनार्दन गतीर, मयुर क्षिरसागर, योगेश आंबेकर, अविनाश कडु, विवेक भगत, शुभम भगत यांच्यासह शेकडो मनसैनिक सहभागी झाले होते.

Similar Posts

error: Content is protected !!