लोहशिंगवे येथे उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

इगतपुरीनामा न्यूज – विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्णमहोत्सव व जगदगुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. त्यानिमित्ताने नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथे जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या आशीर्वादाने, हभप पंढरीनाथ महाराज सहाणे, जगद्गुरू तुकाराम महाराज गुरुकुलचे हभप ज्ञानेश्वर महाराज तुपे यांच्या मार्गदर्शनाने उद्या मंगळवार ९ एप्रिल पासून अखंड हरिनाम  सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. या सप्ताहात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकारांचे कीर्तने होणार आहेत. या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थांनी केले आहे. हभप मुक्ताबाई मालुंजकर, सूर्यकांत महाराज सहाणे, राहुल महाराज खालकर, गणेश महाराज करंजकर, वैभव महाराज झनकर, सुनीताताई कातोरे, गाथामूर्ती मनोहर महाराज सायखेडे यांची कीर्तने होतील. १६ तारखेला जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. रोज ७ ते ९ पर्यंत कीर्तन आणि यानंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!