इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे रामनवमी व हनुमान जन्मोत्सत्व तथा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवानिमित्त मठाधिपती गुरुवर्य माधव बाबा घुले, वै. पोपट महाराज गाजरे यांच्या आशीर्वादाने मंगळवार १६ एप्रिलपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला गायक, वादक, भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळीनी केले आहे. देवराम महाराज गायकवाड, जगदीश महाराज जोशी, संतोष महाराज पायगुडे, एकनाथ महाराज गोळेसर, दिगंबर महाराज सोनवणे, सुखदेव महाराज रजपूत, हभप मठाधिपती माधव बाबा घुले यांची कीर्तने होतील. हभप उमेश महाराज दशरथे यांचे काल्याचे कीर्तन होईल. पहाटे ४ ते ६ ,काकडा भजन, ४ ते ५ प्रवचन, रात्री साडे सहा ते साडे आठ कीर्तन त्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या वतीने दररोज अन्नदान अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. अर्जुन महाराज गाढवे, वैभव महाराज गाढवे, पुंजाराम महाराज गाढवे, दत्ता महाराज वाघ, सुदाम महाराज गायकवाड यांची प्रवचने होतील.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group