इगतपुरीनामा न्यूज – घोटी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामदैवत श्री मारुती मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहन सोहळ्यानिमित्त मंगळवारी शहरातून श्रींच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. घोटीतील नागरिक आपली दुकाने बंद ठेऊन या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले होते. संपूर्ण शहर रांगोळीने सजवण्यात येऊन या मिरणुकीवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामदैवत असलेल्या श्री हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने आज श्री मारुती मूर्ती, श्री गणेश मूर्ती, माता सीता श्रीराम लक्ष्मण मूर्ती, विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली, संत जगद्गुरू तुकाराम महाराज, वीर बलवंतराव महाराज या मूर्तीसोबतच सुवर्णकलश व सुवर्ण ध्वज पताका यांची नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. गंगा जल अभिषेक, द्रव्योत्सर्ग, जलयात्राप्रयोग, पंचगव्य, विविध मंडल स्थापना, नवग्रह होम, जलाधीवास, सायंतन पूजन असे विविध धार्मिक कार्य १५ सपत्नीक यजमानांनी पूजन केले. दिवसभर धार्मिक सोहळ्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता. या प्राणप्रतिष्ठा निमित्त वेद मंत्रांच्या जयघोषात या सोहळ्याला सुरुवात झाली. ७ एप्रिल पर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू राहणार असून, या सोहळ्यात पाचही दिवस विविध धार्मिक कार्यक्रम विविध देवतांचे पूजन व संत महंतांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभणार आहेत.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group