“एकनाथ” नावाच्या ५१ पेक्षा व्यक्तींच्या सहभागाने मुंढेगावला होणार दिमाखदार हरिनाम सप्ताह : श्री संत एकनाथ महाराज जलसमाधी चतुशतकोत्तर महोत्सवानिमित्त भाविकांना मेजवाणी

एकनाथ शिंदे : इगतपुरीनामा न्यूज – प्रारंभापासून अखेरच्या दिवसांपर्यंत म्हणजेच ७ दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी फक्त “एकनाथ” नावांचेच प्रवचनकार, कीर्तनकार, मृदंगमणी, गायक, टाळकरी, चोपदार, विणेकरी, अन्नदाते असणार आहेत. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील गतीर बंधू यांनी ह्या जगावेगळ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या ह्या सप्ताहात तब्बल ५१ पेक्षा जास्त “एकनाथ” नावाचे व्यक्ती सेवा देणार आहेत. श्री संत एकनाथ महाराज जलसमाधी चतुशतकोत्तर ( ४२५ वर्ष ) रौप्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा नामसंकीर्तन महोत्सव संपन्न होणार आहे. यावेळी एकनाथ महाराज गाथा पारायण सोहळा होणार आहे. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे ग्रामीण भागातील प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. ह्या माध्यमाद्वारे सुसंस्कारी पिढी घडवण्याचे महत्कार्य घडते. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे गतीर बंधू यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे. त्यांच्या मोठ्या कुटुंबात वारकरी परंपरेनुसार प्रत्येकजनांकडे काही ना काही कला विकसित झालेली आहे. ह्या परिवाराने स्वतःच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अनेक वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे. ह्या एकनाथ नावाच्या अनोख्या अखंड हरिनाम सप्ताहाला राज्यभरातून अनेक भाविक उपस्थित राहणार आहेत. मुंढेगाव येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दि. २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीला होणाऱ्या ह्या नामसंकीर्तन सोहळ्याला भाविक भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन हभप गतीर बंधू मुंढेगाव यांनी केले आहे. 

ह्या हरिनाम सप्ताहाला पहिल्या दिवसापासून काल्याच्या किर्तनापर्यंत शेकडो जणांचे हात लागत असतात. यामुळेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पडतो. हा सप्ताह राज्यभरात प्रसिद्धी पावलेला आहे. यावर्षी ह्या सप्ताहाचे आगळेवेगळे वैशिष्ठ्य आहे. सप्ताहासाठी फक्त “एकनाथ” ह्या नावाचे लोक विविध अध्यात्मिक सेवा पार पाडणार आहेत. एकनाथ महाराज गाथा पारायण सेवा एकनाथ महाराज कोष्टी करणार आहेत. एकनाथी भागवत प्रवचन सेवा एकनाथ महाराज थोरात, एकनाथ महाराज सातारकर, एकनाथ महाराज शिंदे, एकनाथ महाराज गवारी, एकनाथ महाराज ठुले, एकनाथ महाराज बोरसे हे करणार आहेत. सायंकाळी ६ ते साडेआठ वाजे पर्यंत एकनाथांच्या अभंगावरील कीर्तन सेवा एकनाथ महाराज हेगडकर, एकनाथ महाराज गोळेसर, एकनाथ महाराज भांबळे, एकनाथ महाराज सांगोलकर, एकनाथ महाराज हांडे, एकनाथ महाराज सदगीर, एकनाथ महाराज हरसदकर यांच्याद्वारे होईल. काल्याचे कीर्तन एकनाथ महाराज हरसदकर यांचे होईल.

रोज सकाळी नाष्टा स्व. एकनाथ निवृत्ती गतीर, एकनाथ विश्राम भोसले, एकनाथ सोनू भगत, एकनाथ भावराज गतीर, एकनाथ बाळकृष्ण गतीर, एकनाथ पोपट भोसले, एकनाथ गंभीरे यांच्याकडून तर दुपारचे भोजन संत एकनाथ महाराज पैठण, एकनाथ शेळके, एकनाथ लहाने, एकनाथ कडवे, एकनाथ बऱ्हे, एकनाथ गवळी, एकनाथ महाराज पैठण तातळे बंधू यांच्याकडून देण्यात येईल. रात्रीचा भोजन प्रसाद एकनाथ दराणे, एकनाथ गवारी, एकनाथ जाधव, एकनाथ सीनलकर, एकनाथ धोंगडे, एकनाथ सदगीर, एकनाथ पोटकुले यांच्याकडून देण्यात येणार आहे. महाप्रसादाचे अन्नदान कै. एकनाथ भटाटे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. काकडा भजन संयोजन एकनाथ महाराज चव्हाण, हरिपाठ सेवा संयोजन संत एकनाथ महाराज हरिपाठ मंडळ मुंढेगाव, एकनाथ महाराज हेगडकर , एकनाथ महाराज बऱ्हे, एकनाथ महाराज पोरजे, विणेकरी म्हणून एकनाथ महाराज गंभीरे, एकनाथ शेळके, एकनाथ भोर, तर चोपदार एकनाथ महाराज पोपट भोसले, एकनाथ महाराज विश्राम भोसले, स्पीकर व्यवस्था एकनाथ मंडप डेकोरेटर्स जिव्हाळे यांनी केली आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी एकनाथ पाठक, एकनाथ भोईर, पत्रकार एकनाथ शिंदे राहणार आहेत. कलशपूजन एकनाथ पोटकुले,  दीपप्रज्वलन एकनाथ शेळके, वीणा पूजन एकनाथ चव्हाण, मृदंग पूजन एकनाथ लायरे, टाळ पूजन एकनाथ बाळकृष्ण गतीर, ग्रंथ पूजन एकनाथ भगत, प्रतिमा पूजन एकनाथ भावराज गतीर, गाथा पूजन ध्वज पूजन एकनाथ पोपट भोसले, मंडप पूजन एकनाथ विश्राम भोसले, गाथा पूजन एकनाथ लहाने यांच्याकडून करण्यात येईल. यासह एकनाथ नावाच्या भाविकांनी सप्ताहाला सदिच्छा भेट दिल्यास त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. संपूर्ण सातही दिवस विणेकऱ्याकडून भानुदास एकनाथ असा अखंड नामजप केला जाईल. 

Similar Posts

error: Content is protected !!