
इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
वाघेरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ११ नवनिर्वाचित संचालकांचा इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे व्हॉइस चेअरमन हरिश्चंद्र नाठे, बाजार समिती संचालक सुनील जाधव, राजाराम धोंगडे, माजी सभापती सोमनाथ जोशी, साहेबराव जाधव आदींनी संचालकांचा सत्कार केला. आगामी काळात शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून अग्रेसर काम करण्यासाठी नवे संचालक मंडळ झपाट्याने काम करतील असा विश्वास सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
वाघेरे सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक काळू भोर, कांतीलाल भोर, दशरथ भोर, पुंजा भोर, बाळु भोर, रघुनाथ भोर, वसंत मांडे, सुंदराबाई चौधरी, लीलाबाई भोर, मोहन भोर यांनी सत्कार स्वीकारला. अनुभवी आणि जेष्ठ नेत्यांच्या सन्मानाने शेतकऱ्यांचे काम करण्यास ऊर्जा मिळाली असल्याचे उदगार संचालकांनी यावेळी काढले. इगतपुरी तालुक्यातील विविध सोसायटी निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सर्व संचालकांवर जनतेने विश्वास टाकला असून त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देऊ नका. सर्वांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असून आपण चांगल्या कामाचा हिमालय उभा करू असे यावेळी पदाधिकारी म्हणाले.