नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेच्या तत्परतेने हृदयविकाराच्या रुग्णाला मिळाला अत्यावश्यक उपचार : बचावलेल्या रुग्णाने मानले नरेंद्राचार्य संस्थानचे आभार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

नाशिकहुन मुंबईकडे जाणाऱ्या एका प्रवाशी टॅक्सीमध्ये एका प्रवाशाला छातीत दुखू लागले. मात्र टॅक्सीचालकाने त्याला मुंबई आग्रा महामार्गावर जिंदाल कंपनी फाट्यावर उतरून दिले. याबाबत स्थानिक नागरिकांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेला माहिती देऊन पाचारण केले. रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने दाखल होऊन गंभीर रुग्णाला घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हृदयविकार झालेल्या ह्या रुग्णाला तात्काळ आवश्यक उपचार मिळाल्याने त्याचा बहुमोल प्राण वाचला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेच्या सेवेमुळे ह्या व्यक्तीला जीवदान मिळाल्याने त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे. संतोष गुलाबराव आवटे वय 37 रा. कल्याण असे गंभीर रुग्णाचे नाव असून ही घटना आज सायंकाळी सव्वापाच वाजता घडली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!