इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
लढाई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, हम सब एक है,अरे या सरकारचे करायचे काय… खाली डोकं वर पाय, एक रुपयाचा कडीपत्ता…सरकार झालंय बेपत्ता, अशा आवेशपूर्ण घोषणात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. टायगर बहुद्देशीय संस्था ( संघटना ), टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सर्व स्तरातून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरन करावे, ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यांवी, एसटी महामंडळ संपकरी कर्मचारी यांच्यावर होणारा अन्याय त्वरित थांबवा ह्या मागण्या पाठिंब्याच्या पत्रात केल्या आहेत. यावेळी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. पै. तानाजी गोकुळ जाधव, टायगर ग्रुप नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पै. सचिन जाधव, टायगर ग्रुप इगतपुरी तालुका प्रमुख पै. आनंद बर्वे उपस्थित होते.