आगरी सेनेकडून शेतकरी विकास पॅनलच्या १८ उमेदवारांना सक्रिय पाठिंबा : सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आगरी सेना प्रत्यक्ष काम करण्यास कटीबद्ध – संपत डावखर

इगतपुरीनामा न्यूज – शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार आणि नेते हे बाजार समिती आणि इगतपुरी तालुक्याच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असतात. अशा सर्व व्यक्तींच्या पाठीशी उभे राहून सामान्य शेतकरी आणि लोकांचा विकास साधने अत्यावश्यक असते. आगरी सेना नेहमीच विकासाची कास धरणाऱ्या विचारांवर काम करीत असते. म्हणून नाशिक जिल्हा आगरी सेनेने लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व १८ उमेदवारांना सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी विकास पॅनलच्या १८ उमेदवारांच्या कपबशी निशाणीवर ठसा देऊन त्यांना विजयी करण्याबद्धल नाशिक जिल्हा आगरी सेनेने प्रत्यक्ष कार्यवाही सुरु केली आहे. आगरी सेनेचे सर्व सक्रिय पदाधिकारी शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी काम सुरु करीत असून पाठिंबा घोषित करीत असल्याचे पत्रक आगरी सेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख तथा इगतपुरीचे माजी नगरसेवक संपतराव डावखर, तालुकाप्रमुख नारायण वळकंदे यांनी काढले आहे. विकास आणि समावेशक राजकारण ही इगतपुरी तालुक्याला आवश्यक बाब असून आगरी सेना विकासाभिमुख व्यक्तींच्या पाठीशी असते. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणारे प्रतिनिधी घोटी बाजार समितीसाठी गरजेचे असून त्यासाठी शेतकरी विकास पॅनल हा समर्थ आणि भक्कम पर्याय आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी प्रचारात सहभागी होतील आणि विजयाचा जल्लोष सुद्धा करतील. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव आदी पॅनलच्या नेत्यांच्या सोबत राहून १८ उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करण्यात आगरी सेना कटीबद्ध आहे असेही आगरी सेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख तथा इगतपुरीचे माजी नगरसेवक संपतराव डावखर, तालुकाप्रमुख नारायण वळकंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!