नाशिक येथील शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसला इगतपुरी तालुक्यात अपघात : ४ विद्यार्थी गंभीर ; चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ – नाशिकचे शालेय विद्यार्थी असलेल्या एका बसला इगतपुरी तालुक्यात अपघात झाला आहे. सर्वतीर्थ टाकेद भागात म्हैसवळण घाटात अपघाताची घटना घडली आहे. अपघातात ४ विद्यार्थी गंभीर तर ३ जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. जखमींना धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असून बसचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. दरीत जाणारी बस त्याने मोठ्या प्रयत्नांनी डोंगर असलेल्या भागाजवळ वळवली. ह्यामध्ये बस मातीत रुतल्यामुळे बस पलटी झाली. टाकेद येथे नाशिकहून बसद्वारे दर्शनाला हे विद्यार्थी आले होते. परत जात असताना ही घटना घडली.

Similar Posts

error: Content is protected !!