इगतपुरीनामा न्यूज, दि. १
इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील डॉ. गणेश राणू लहाने यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची आचार्य पदवी ( Ph. D ) मिळाली आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे कृषिमंत्री ना. दादा भुसे यांच्या हस्ते पदवी अनुग्रहित करण्यात आली. कृषी मधील अनुवांशिक शास्त्र आणि वनस्पती प्रजनन ( Genetics & Plant breeding ) या विषयामध्ये त्यांना आचार्य पदवी ( Ph.D ) प्रदान करण्यात आली. ( Cytological & molecular analysis in trispecies derivatives of cotton ) असा त्यांचा संशोधनाचा विषय होता.
गणेश लहाने यांचे प्राथमिक शिक्षण १ ली ते ४ थी गिरणारे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. नंतरचे शिक्षण ५ वी ते १२ वी पर्यंत जनता विद्यालय हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इगतपुरी येथे झाले. बारावीनंतर त्यांनी कृषी ( Agriculture ) मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तळेगाव दाभाडे येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी, येथे २००६ मध्ये प्रवेश मिळाला. इथूनच खऱ्या अर्थाने प्रवासाला सुरुवात झाली. कॉलेज फी भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी शैक्षणिक कर्ज काढून २०१० साली बी. एस्सी शिक्षण पूर्ण केले. नंतर एम.एस्सी ( कृषी ) Genetics and Plant breeding ला प्रवेश मिळविण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सुयश मिळवून देशामध्ये ११८ वा क्रमांक मिळविला. नंतर त्यांचे प्रवेश एम. एस्सी ( कृषी ) Genetics and Plant breeding या विषया मध्ये २०११ मध्ये गुजरातमधील सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ पालनपुर, गुजरात येथे झाला. तिथे त्यांना डॉ. आर. एम. चौव्हान यांचे मार्गदर्शन लाभले. २०१३ ध्ये त्यांचे एम. ए.स्सी ( कृषी ) चे शिक्षण पूर्ण झाले. त्यांना तेंव्हाच आचार्य पदवी ( Ph.D ) ला प्रवेश घ्यायचा होते. पण बी. एस्सी ( कृषी ) ला घेतलेले शैक्षणिक कर्ज भरायचे असल्यामुळे त्यांनी शिक्षणं तात्पुरते सोडले. दरम्यान त्यांनी कृषी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक ( Assistant Professor ) म्हणून नोकरी केली. कर्ज उतरत आल्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठामध्ये आचार्य पदवी ( Ph.D ) साठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथून घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेमध्ये यश मिळवत महाराष्ट्रमध्ये तिसरा क्रमांक मिळविला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आचार्य पदवी ( Ph.D ) Genetics and Plant breeding या विषया मध्ये प्रवेश मिळाला. तेव्हा पण त्यांना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागले. फी जास्त असल्यामुळं त्यांनी यावेळेस कर्ज न काढता बी. एस्सी व एम. एस्सी मधील जवळच्या मित्रांकडून उसने पैसे घेतले. घरच्याकडून मदत घेतली. फी भरण्याची व्यवस्था झाली होती पण त्यांचे संशोधन कार्य हे नांदेड येथे कापुस संशोधन केंद्र येथे सुरू होते. तेव्हा ते रोज सकाळी ६ ते संध्याकाळी ६ अशी दिनचर्या करत असे. त्यासाठी लागणारे खर्च कपात करून कसे तरी ३ वर्ष काढली. काही संशोधनाचा काळ नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्था येथे काढला. संशोधन कार्य संपल्यानंतर त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी, विद्यापीठ, परभणी येथे येऊन थेसिस (प्रबंध ) सादर केला. आचार्य पदवी (Ph.D) चे मार्गदर्शक म्हणून डॉ. के.एस. बेग यांचे मार्गदर्शन लाभले.