मुकणे परिसरात बिबट्याचा उच्छादाने ऐन दिवाळीत नागरिक दहशतीखाली

प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १

इगतपुरी तालुक्यातील मुकणे शिवारात बिबट्याचा गेल्या अनेक महिन्यांचा मुक्त संचार कायम आहे. बिबट्याच्या भीतीने मुकणे ग्रामस्थ व शेतकरी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत अनेकदा कळवुनही वेगवेगळे कारण देत वेळकाढूपणा करीत असल्याने मुकणे ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे. इगतपुरी वनविभागाला मुकणे शिवारात बिबट्या असल्याचे अनेकदा सांगूनही वनविभाग जागे कधी होणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. नागरीक आधीच दहशतीखाली असतांना बिबट्या दिवसाढवळ्याही नागरिकांच्या नजरेस पडु लागल्याने नागरिक अधिकच दहशतीखाली आले आहे.

मुकणे कॉलनी जवळ जुनावना शिवारालगतच्या बोराडे यांच्या वस्तीजवळील शेतात दबा धरुन बसलेला बिबट्या हरी बोराडे या शेतकऱ्याने वेळीच पाहिल्याने तिथुन पळ काढला. यामुळे भयभीत झालेले बोराडे व परिसरातील नागरिक व शेतकरी यांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. मुकणे व मुंढेगाव या दोन्ही गावच्या गायकुरणांमध्ये झाडे व झुडपे अधिक प्रमाणात असल्याने येथे बिबट्याला व हिंस्त्र प्राण्यांना लपण्यासाठी सोयीची जागा आहे. या शिवारातील शेतकऱ्यांना दिवसा बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. सुरवातीलाच संतोष राव व गणेश राव यांचे दोन कुत्रे, नारायण वाबळे यांची गाय तर अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्या, वासरेही बिबट्याने फस्त केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच गणेश राव यांच्या बंगल्याजवळुन कुत्रे फरफटत नेले तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजे दरम्यान त्याच ठिकाणाजवळ पुन्हा बिबट्या नजरेस पडला. ही घटना वनकर्मचारी पोटींदे यांना सांगितली. मात्र यावर पिंजरा लावण्याची अद्यापही कार्यवाही  झाली नाही.

आज दुपारी एक वाजे दरम्यान जुनावना शिवारातील हरी बोराडे हे जनावरांसाठी शेतात चारा कापायला जात असताना त्यांनी उसाच्या शेतात बिबट्या असल्याचे पाहताच त्यांनी पळ काढल्याने ते वाचले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी येथे पाहणी केली असता बिबट्या पुन्हा त्यांच्या नजरेस पडल्याने नागरिकांत एकच भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना दिवसाही शेताकडे जाणे मुश्किल झाले असुन सध्या भातसोंगणीचा हंगाम असुन बिबट्याच्या भीतीने शेतमजुरांनाही शेतावर काम करण्याची भीती वाटत आहे. वनविभागाने येथे पिंजरा लावुन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी मुकणेचे सरपंच हिरामण राव, उपसरपंच भास्कर राव, गणेश राव, निवृत्ती आवारी, हरी बोराडे, सूर्यभान बोराडे, नरहरी आवारी, रवींद्र बोराडे, समाधान आवारी आदींसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!