जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांचा इगतपुरीत मोर्चा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – जुनी पेन्शन योजना लागु करावी या मागणीसाठी सर्व सरकारी कर्मचारी गेल्या सात दिवसांपासून संपावर आहेत. जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे. गेली १८ वर्ष झाली सरकारने नवीन पेन्शन योजना आणल्यानंतर वारंवार १८ वर्षापासून निदर्शने, मोर्चे, आंदोलने केली. मात्र सरकारने यावर झोपेचे सोंग घेतले. म्हणून गेल्या सात दिवसांपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. आजच्या मुंबई येथील बैठकीत जर यावर निर्णय झाला नाही तर हा संप असाच पुढे सुरु राहणार असल्याचे जुनी पेन्शन योजना संघटनेने मोर्चा दरम्यान सांगितले.राज्य कर्मचारी यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. मात्र सरकार या मागण्या मान्य करीत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इगतपुरी शहरातील महिंद्रा कंपनी ते तहसीलदार कार्यालयापर्यंत तीन किलोमीटर लांब पायी भव्य मोर्चा काढण्यात आला.

मोर्चाचे नेतृत्व ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद ठाकरे, जुनी पेन्शन योजना संघटना, ग्रामसेवक संघटना तालुकाध्यक्ष दिपक पगार, सचिव रामेश्वर बाचकर, महासंघ अध्यक्ष विजयराज जाधव, विस्ताराधिकारी संजय पवार, कापडणीस सर, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, संदीप निरभवणे, ज्ञानेश्वर पाटील, आनंद पाटील, प्रमोद परदेशी यांनी केले. सर्वांतर्फे इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात तालुक्यातील ग्रामसेवक संघटना, जिल्हा कमेटी महासंघ, शिक्षक समिती संघटना, डीसीपीएस संघटना, शिक्षक भारती संघटना, आरोग्य संघटना, आदिवासी शिक्षक संघटना, पदविधर शिक्षक संघटना, समता परिषद संघटना, स्वाभिमानी संघटना, मागासवर्गीय संघटनेचे हजारों पदाधिकारी शिक्षक, शिक्षिका, आरोग्य कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, पंचायत समितीचे कर्मचारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

Similar Posts

error: Content is protected !!