इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, शिवसेना गट, भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्या शिरसाठे जिल्हा परिषद गटातील रविवारी झालेल्या प्रचारदौऱ्याला झंझावाती प्रतिसाद लाभला. ह्या प्रचारदौऱ्यात महाविकास आघाडीतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करून हिरामण खोसकर यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी सक्रिय सहभागी होणार असल्याचे घोषित केले. माजी आमदार निर्मला गावित यांचे कट्टर समर्थक आवळी येथील दशरथ जमधडे, रायांबे येथील संदीप धांडे, गजीराम धांडे आदींनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा स्वीकारून पक्षात प्रवेश केला. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांना निवडून देऊ असा शब्द यावेळी सर्वांनी दिला. याप्रसंगी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. दरम्यान हिरामण खोसकर यांच्या प्रचाराला मतदारांकडून पसंती दिली जात असून निवडणुक ज्वर वाढला आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group