कवितांचा मळा : “संत सावता हरि”

लेखन :- जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१

आजोबा देवु माळी !
पिता पुरसोबा कुळी !!
आरणगावचे भाळी !
जन्मे सावता माळी !!
भानवसे रुपमाळी !
जनाई जन्मली कुळी !!
नवरा सावता हरि !
जनाईशी लग्न करी !!
संत सावत्याचे घरी !
वसा असे वारकरी !!
सेवा पांडुरंगे करी !
संत सावता तो हरि !!
संत सावत्याची वारी !
विठ्ठल शेतात करी !!
सावता विठ्ठल हरि !
न करे पंढरी वारी !!
संत सावत्याचे मळा !
विठ्ठल भेटती गळा !!
विठ्ठल दिसे सावळा !
भोळ्या भक्ता लावी लळा !!
वारकरी भक्त भोळा !
तुळसी घालुनी गळा !!
एकादशी तो सोहळा !
वारकरी होती गोळा !!
सावता राबती मळा !
हरी नाम घेई गळा !!
सावत्याची भक्ती न्यारी !
कर्म करी शेतकरी !!
कांदा, मुळा, कोथंबीरी !
फुला, फळा दिसे हरि !!
सावत्याची ती पंढरी !
नाम मुखी गाती हरि !!
संत ज्ञानेश्वर वाणी !
सावता ऐकती गाणी !!
ईश्वर चिंतन मनी !
पांडुरंगे बसे ध्यानी !!
सावता असती गुणी !
पांडुरंग वसे मनी !!
नामदेव ज्ञानेश्वरी !
पांडुरंगा शोध करी !!
शोधी सावत्याचे घरी !
दावा पांडुरंग हरि !!
विठ्ठल शेता राबती !
संत सावता सांगती !!
संत सावत्याची ख्याती !
कापी खुरप्याने छाती !!
सावता छाती फाडती !
देव विठ्ठल दिसती !!

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!