इगतपुरी तालुक्याचा १२ वी परीक्षेत ९४.२२ टक्के निकाल ; सर्व केंद्रांच्या गुणवत्तेत प्रगती : प्रथम श्रेणीत ६१० तर द्वितीय श्रेणीत १ हजार २४९ विद्यार्थी उत्तीर्ण ; ५४ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य

इगतपुरीनामा न्यूज – बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होऊन इगतपुरी तालुक्याचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. यावर्षी उच्च श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गात समाधानाचे चित्र आहे. तालुक्यात उच्च माध्यमिक व कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे २ हजार २८१ विद्यार्थी परीक्षेला होते. त्यात २ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ५४ विद्यार्थी विशेष उच्च श्रेणीत (डिस्टिंगशन) मध्ये तर ६१० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १ हजार २४९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. आदिवासी भाग असूनही विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता व निकालात भरीव प्रगती असल्याचे दिसते.

केंद्रनिहाय शाळांचा निकाल असा आहे. ( कंसात टक्केवारी ) : जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय घोटी ( १०० ), आदर्श कन्या विद्यालय ( ९५.७७ ), म. गां. माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुल इगतपुरी ( ९४.७६ ), केपीजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ( ९५.२९), जनता विद्यालय व ज्यू. कॉलेज इगतपुरी ( ९६.८७ ), वंडरलँड हायस्कुल व ज्यु. कॉलेज इगतपुरी ( ९७.८७), न्यू इंग्लिश स्कूल कवडदरा ( ९६.३६ ), न्यु इंग्लिश स्कूल टाकेद ( ९६.२८), श्री सिद्धिविनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोंदे दुमाला ( ९१.५८ ), व्ही. एन. पाटील उच्च माध्यमिक विद्यालय इगतपुरी (८३.९० ), न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आहुर्ली ( ९२.५९ ), न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघेरे ( ९२.०६ ), श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खेडभैरव ( ९७.८२), माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाडीवऱ्हे ( ८०.७०), सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक घोटी (८०), ज. वि. घोटी व्हिओसी अभ्यासक्रम (१०० ), म. गां. हायस्कुल आरंभ महाविद्यालयात ( ९४.१८ ) व्हीओसी अभ्यासक्रमात विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!