विकासाच्या लाटेत सामील व्हा : जिल्हाप्रमुख विजय करंजकर : हरसूल येथे शिवसंपर्क अभियानाला दमदार प्रारंभ

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१

शिवसेनेच्या माध्यमातून कुशल आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीतुन तळागाळातील जनतेपर्यंत शिवसैनिकांच्या सहकार्याने अनेक योजना पोहचत आहेत. मात्र काही ठिकाणी शिवसैनकांची नाराजी तर काही उत्साह वाढीस लागल्याचे चित्र दिसत आहेत. मात्र दिवसेंदिवस  शिवसैनिकांच्या पक्षातील प्रवाहामुळे विकासाची लाट अधिक मजबूत होत चालली आहे. या विकासाच्या लाटेत सामील व्हा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले. हरसूल येथे शिवसंपर्क अभियानाच्या प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते.  

कोरोना सारख्या महामारीत शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकासकामे तसेच विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. हरसूल सारख्या तळागाळातील आणि अतिदुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहचविण्यात शिवसैनिकांची मोलाची भूमिका आहे. यामुळे अंतर्गत गट- तट विसरून शिवसैनिकांनी गण, गटात हिरारीने सहभाग नोंदवून काम केले पाहिजे. आपल्या भागाचा विकास करून घेत सामजिकदृष्टीने लक्ष दिले पाहिजे. महाराष्ट्रात विकासाची लाट सुरू असून या विकासाच्या लाटेत आपणही सहभागी व्हा. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी तळागाळातील शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहनही जिल्हाप्रमुख करंजकर यांनी केले.

यावेळी माजी आमदार निर्मला गावीत यांनी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील शिवसैनिक काम करत आहे. याच भागातील शिवसेनेचे नेते तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै. पांडुरंग राऊत यांनी हरसुलसारख्या ग्रामीण भागात शिवसेनेचा पाया रोवला आहे. यामुळे आजमितीला शिवसेना या भागात कटाक्षाने शिवसैनिकांच्या माध्यमातून काम करत आहे. गण, गट तसेच तालुक्यांच्या आगामी येणाऱ्या निवडणूकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी शासनाने कोरोना काळात घालून दिलेल्या नियमांचे पालन करत अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यात विद्यार्थी सेनाप्रमुख मिथुन राऊत, तालुका समन्वयक समाधान बोडके, देविदास जाधव, जनार्धन पारधी आदींचा समावेश आहे.

हरसूल येथील ग्रामपंचायत सभागृहात अभियानप्रसंगी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार निर्मला गावीत, काशीनाथ मेंगाळ, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, सभापती सोमनाथ जोशी, त्र्यंबकेश्वर तालुका
समन्वयक समाधान बोडके, रमेश गावीत, तालुकाप्रमुख संपत चव्हाण, रवी वारुंगसे, कचरू डुकरे, मिथुन राऊत, हिरामण जाधव, देविदास जाधव, नितीन लाखन, आखलाख शेख, प्रमोद कोथमिरे, बाळा महाले, ममता देशमुख, नंदा शेंडे, राधा लाखन, किरण तरवारे, प्रवीण तुंगार, पुंडलिक कनोजे, विठ्ठल पवार, विष्णू बेंडकोळी, विठ्ठल भोये, लक्ष्मण मेघे,आरीफ सय्यद, शंकर भोये, रमेश भोये, अशोक लांघे, मोहन कनोजे, हिरामण राऊत, काशीनाथ वळवी, दत्ता व्यवहारे, संतोष देशमुख, निलेश चौधरी, जगदीश भोये, प्रमोद भोये, रघुनाथ पोटींदे, हरिदास राऊत, यशवंत धनगर, जगन गोराळे, यादव गवळी, अशोक कनोजे, अंबादास माढी, अंबादास बेंडकोळी, नितीन राऊत,संजय देशमुख, विनोद भोये, अनिल बोरसे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी परवेज शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!