गोरख बोडकेंच्या साहाय्याने उघड्यावर आलेल्या परिवाराला मिळणार घरकुल ; बलायदुरीच्या आगग्रस्त कुटुंबाला संसारोपयोगी साहित्याची मदत

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
कोरोना महामारीमुळे अनेकजण आधीच व्यथित असतांना इतरही संकटांची मालिका संपत नाही. अशा भयानक काळात मदत आणि सहकार्याची भावना लोप पावत चालली आहे. अप्पलपोटेपणा करून स्वतःला मोठे नेते म्हणवणारे महारथी राजकारणी सुरक्षितपणे “सोशल मीडियावरून शेळ्या हाकत” आहेत. अशा काळात इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील घर आणि संपूर्ण संसार जळाल्याने उघड्यावर आलेले भगत कुटुंबही माणुसकीच्या देवदूताची प्रतीक्षा करीत होते. आगीमुळे घरासह सर्वच चीजवस्तू, पैशांची राखरांगोळी झाल्याने भगत परिवाराच्या डोळ्यांतील अश्रूही सुकले होते. अशा बिकट काळात माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके साक्षात परमेश्वरासारखे त्यांच्या मदतीला धावले. संसारोपयोगी साहित्याची मदत आणि जगायला मदत करणारा प्रेमळ दिलासा गोरख बोडके यांनी दिल्याने भगत कुटुंबही भारावून गेले. शक्य तेवढ्या लवकर शासकीय योजनेतून घरकुल देण्याचे वचन मिळाल्याने भगत परिवाराने आनंद व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील कैलास लुक्कड भगत यांचे राहते घर आगीत भस्मसात झाले. त्यामध्ये घरातील सर्व वस्तु- संसार आगेत जळून खाक झाला. यासह रोख रक्कम ५ लाख आणि ४ तोळे सोनेही खाक झाले. याबाबत माहिती समजताच माणूसकीच्या धर्म निभावण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी भगत परिवाराला भेट देऊन दिलासा दिला. त्यांच्याकडून भगत कुटुंबाला मदत म्हणुन घरातील संसार उपयोगी वस्तु देण्यात आल्या. शासकीय योजनेतून त्या कुटुंबाला घरकुल देण्यासाठी त्यांनी साहाय्य करण्याचा शब्द दिला. आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचा दिलासा त्यांनी दिला. यावेळी माजी सरपंच कैलास भगत, जेष्ठ नेते मल्हारी गटखळ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!