देवळे उघडेवाडी राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अपूर्ण :
सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – इगतपुरी तालुक्यातील  देवळे उघडेवाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दाही दिशा भटकावे लागत आहे. म्हणून ह्या पेयजल योजनेचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा इगतपुरीच्या पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सरपंच ज्ञानेश्वर उघडे, उपसरपंच ज्ञानेश्वर तोकडे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत उघडे, लहानु उघडे, ललिता उघडे, शेवंताबाई उघडे, फुलाबाई उघडे, रंजना तोकडे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. नाशिकचे पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता यांना ग्रामस्थांनी पत्रव्यवहार केला आहे. ह्या योजनेचे काम अपूर्ण असल्याकारणाने येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल सोसावे लागत आहे. अर्धा किलोमीटर अंतरावरुन डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करावी लागते. पेयजल योजनेचे रखडलेले काम तात्काळ सुरू न केल्यास बुधवार ५ एप्रिलपासून पंचायत समिती इगतपुरी येथे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ ठेकेदाराला काम पूर्ण करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी सीताराम उघडे, भागूजी उघडे, दगडू पोकळे, धनु उघडे, लालू आघाण, फुल्याबाई उघडे, शेवंताबाई उघडे, गोपाळ उघडे आदींनी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!