योगासने काळाची गरज – नानासाहेब महाले : त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन योगासने स्पर्धा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३

प्राचीन काळापासून साधूसंतांनी योगासनाला महत्त्व दिले. योग साधना, योगविद्या, ध्यानधारणा यांचे महत्त्व असून वेगवेगळ्या आजारांवर प्रभावी ठरते आहे. योगाचे शिक्षण देण्याचे काम प्राचीन परंपरेमुळे असल्याने विद्यार्थ्यांनी योगासने व त्यातील स्पर्धांचे ज्ञान घ्यावे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवनमान प्रचंड बदलले म्हणून मनःशांती साठी योगाशिवाय पर्याय नाही. योगामुळे बलवान सौंदर्य व आंतरिक सौंदर्य साध्य होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध योगासने त्यांचे महत्व व गरज याची जबाबदारी स्वीकारून सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असावे असे प्रतिपादन मविप्रचे संचालक नानासाहेब महाले यांनी केले. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, पुणे व नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि मविप्रचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन योगासने ( मुले व मुली ) स्पर्धांचे उदघाटन संपन्न झाले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब महाले तर प्रमुख अतिथी म्हणून दत्ताकाका पाटील, दादा कापडणीस, आप्पासाहेब कुलकर्णी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. खेळाडू होण्याची संधी व वातावरण हे ग्रामीण भागात असल्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धेतून विद्यार्थी नावलौकिक मिळवतो. त्यासाठी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित केल्या जातात. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी  या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. वेगवेगळ्या एकूण 18 महाविद्यालयांमधून 5 मुले व 38 मुली अशा एकूण 43 स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात हनुमान प्रतिमा पूजनाने झाली. मान्यवरांचा सत्कार प्राचार्यांनी केला. कार्यक्रमाप्रसंगी नाशिक विभागाचे सहसचिव प्रा. नरेंद्र निकम, प्रा. दिलीप मोरे, योगशिक्षिका डॉ. मीनाक्षी गवळी, प्रा. सुरेश इंगळे ,प्रा. रवींद्र चव्हाण आणि वेगवेगळ्या महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक संचालक व मार्गदर्शक उपस्थित होते. क्रीडा संचालक डॉ. दिनेश उकिर्डे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी सत्रप्रमुख प्रा. संदीप गोसावी, प्रा. विक्रम पोटे सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!