इगतपुरीनामा न्यूज, दि. 28
कोरोनाचा कहर सगळीकडे सुरूच असून रुग्णसंख्येतही वाढ होते आहे. आज एकाच दिवशी इगतपुरी तालुक्यात नव्या 59 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. दिवसभरात 30 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार 315 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळून आल्यास तातडीने जवळच्या शासकीय संस्थेत चाचणी करून घ्यावी. कोरोना बरा होऊ शकतो म्हणून घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासह कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतल्यास धोक्यापासून दूर राहता येईल. इगतपुरी तालुक्यातील विविध नागरिकांनी लसीकरण केले असून लस सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. गावोगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या गावात प्रत्येकाचे लसीकरण करण्यासाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
■ काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत.
– बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी