
इगतपुरीनामा न्यूज, दि. १
घोटीच्या प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी सालाबादप्रमाणे नव्या वर्षाच्या पहाटेच महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखराची चढाई केली. नव्या नव्या वर्षातील पहिल्या सूर्योदयाचे पहिले किरण पडताच कळसुबाई मातेचा अभिषेक करून महाआरती करण्यात आली. कोरोना राक्षसाच्या तिसऱ्या लाटेपासून जनतेला वाचव असे साकडे कळसुबाई मातेचरणी गिर्यारोहकांकडून घालण्यात आले. यावेळी मातेचा जयघोष करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय,भारत माता की जय या घोषणा देऊन इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. या उपक्रमात औरंगाबाद जिल्ह्यातील दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, निलेश पवार, बाळासाहेब आरोटे, सुरेश चव्हाण, गजानन चव्हाण, प्रविण भटाटे, अशोक हेमके, आदेश भगत, ज्ञानेश्वर मांडे, सोमनाथ भगत, नितीन भागवत, शुभम जाधव, उमेश दिवाकर, पुरुषोत्तम बोऱ्हाडे, रमेश हेमके, रुद्रेश हेमके, भगवान तोकडे, देविदास पाखरे, कृष्णा बोऱ्हाडे, नगमा खलिफा, चतुर्थी तोकडे आदी गिर्यारोहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
