वीज कोसळून मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाला शासकीय मदत देणार ; आमदार हिरामण खोसकर यांची पीडित कुटुंबाला भेट

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
वीज पडून मृत्यू पावलेल्या युवकाच्या पीडित कुटुंबाला शक्य तेवढ्या लवकर शासकीय मदत मिळवून देऊ. गोपीनाथ मुंढे योजने अंतर्गत सुद्धा आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी दिले. शिद कुटुंबाच्या संपूर्ण पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. शिदवाडी येथे आमदार खोसकर यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी अहिलू देवराम शिद हा १९ वर्षीय आदिवासी युवक काही दिवसांपूर्वी वीज कोसळल्याने ठार झाला होता. या पार्श्वभूमीवर इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन दिलासा दिला. सर्व विचारपूस करून संबंधितांचे सांत्वन केले. कुटुंबाचा कर्ता युवक काळाने हिरावल्याने दुःख वाटत आहे. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून आर्थिक मदत मिळवून देऊ असे ते म्हणाले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी खैरगावचे सरपंच ॲड. मारुती रामभाऊ आघाण, खंडू परदेशी, संतोष रौदळे, ज्ञानेश्वर कडू, दौलत दुभाषे, अनिल परदेशी, ईश्वर दालभगत, देवराम शिद, गुणाजी गांगड, सुरेश शिद, मोहन शिद, लहू शिद, अंतू शिद, दशरथ शिद आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!